Darshan missal GCA Premier League  Dainik Gomantak
क्रीडा

जीसीए प्रीमियर लीगमध्ये दर्शन, फेलिक्समुळे चौगुलेचे पारडे जड

जीनो क्लबची घसरण;  एमसीसीविरुद्ध करिमाबाद संघाला आघाडी

Kishor Petkar

पणजी : जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या लिलावात डावखुऱ्या दर्शन मिसाळला सर्वाधिक गुणांचा भाव मिळाला होता, या अनुभवी अष्टपैलूने निवड सार्थ ठरविताना शानदार 84 धावा करून चौगुले स्पोर्टस क्लबला सावरले. नंतर वेगवान गोलंदाज फेलिक्स आलेमावने पाच गडी टिपत जीनो क्लबचे कबंरडे मोडले. त्यामुळे तीन दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी चौगुले संघाचे पारडे जड झाले. (Darshan missal GCA Premier League News Updates)

सामन्याला बुधवारपासून कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या बांदोडकर मैदानावर सुरवात झाली. चौगुले क्लबच्या 226 धावांना उत्तर देताना दिवसअखेर जीनो क्लबची 7 बाद 73 अशी घसरगुंडी उडाली होती. ते अजून 153 धावांनी मागे आहेत. सांगे येथील जीसीए मैदानावर गतविजेत्या मडगाव क्रिकेट क्लबला (एमसीसी) 129 धावांत गुंडाळल्यानंतर करिमाबाद क्लबने 3 बाद 170 धावा करून पहिल्या डावात 41 धावांची आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर चौगुले क्लबची 6 बाद 74 अशी दाणादाण उडाली होती. दर्शनने पियुष यादव (नाबाद 61) याच्यासमवेत सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करून संघाला सावरले. दर्शनने 92 चेंडूंतील खेळीत 12 चौकार व 2 षटकार मारले. नंतर पियुषने फेलिक्स आलेमाव (23) व शदाब खान (15) यांच्यासमवेत किल्ला लढविल्यामुळे चौगुलेला सव्वादोनशे धावांचा टप्पा गाठता आला.

वैभव गोवेकर (34) व मंथन खुटकर (24) यांनी दिलेल्या 59 धावांच्या सलामीमुळे एमसीसीची सावध वाटचाल सुरू होती, मात्र नंतर त्यांची 7 बाद 83 अशी घसरगुंडी उडाली. त्यातून त्यांना नंतर सावरताच आले नाही. करिमाबाद क्लबला अझान थोटा (30) व आलम खान (25) यांनी 63 धावांची सलामी दिली, नंतर तुनीष सावकार (39) व दीपराज गावकर (37) यांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची अभेद्य भागीदारी करून संघाला आगाडी मिळवून दिली.

संक्षिप्त धावफलक

चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव : 52.3 षटकांत सर्वबाद 226 (दर्शन मिसाळ 84, पियुष यादव नाबाद 61, फेलिक्स आलेमाव 23, शदाब खान 15, शुभम गजिनकर 15, ऋत्विक नाईक 3-55, अभिषेक 2-31, सावियो काल्को 2-22, मोहित रेडकर 1-77, अमूल्य पांड्रेकर 1-41). जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव : 30 षटकांत 7 बाद 73 (अमोघ देसाई 15, शिवम आमोणकर 11, गौरीश कांबळी 16, मोहित रेडकर नाबाद 12, फेलिक्स आलेमाव 5-31, कृष्णन उन्नी 7-1-14-2).

एमसीसी, पहिला डाव: 40.4 षटकांत सर्वबाद 129 (वैभव गोवेकर 34, मंथन खुटकर 24, हेरंब परब 28, विजेश प्रभुदेसाई नाबाद 16, लक्मेश पावणे 3-32, दीपराज गावकर 1-43, वेदांत नाईक 2-11, अझान थोटा 2-1). करिमाबाद क्रिकेट क्लब, पहिला डाव: 39 षटकांत 3 बाद 170 (अझान थोटा 30, आलम खान 25, कश्यप बखले 21, तुनीष सावकार नाबाद 39, दीपराज गावकर नाबाद 37, विश्वंबर काहलोन 1-36, ओमप्रकाश चौहान 1-31, सुजय नाईक 1-18).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT