CK Nayudu Trophy | Yogesh Kavthankar
CK Nayudu Trophy | Yogesh Kavthankar Dainik Gomantak
क्रीडा

CK Nayudu Trophy: गोव्याच्या चिवट फलंदाजीनंतरही छत्तीसगडचा विजय

किशोर पेटकर

CK Nayudu Trophy: संघातील तिघे खेळाडू पूर्ण तंदुरुस्त नसल्याने कर्नल सी. के. नायडू करंडक २५ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील गोव्याचा पराभव सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर निश्चित झाला होता, मात्र बुधवारी बाकी फलंदाजांनी झुंजार वृत्ती प्रदर्शित केली. त्यामुळे सात विकेटने सामना जिंकलेल्या छत्तीसगडला घाम गाळावा लागला.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर गोव्याने ६ बाद १८० धावा केल्या होत्या व त्यांच्यापाशी फक्त पाच धावांची आघाडी होती. सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात योगेश कवठणकर याने चिवट फलंदाजी केली.

त्याला जखमी अवस्थेत रोहन बोगाटी याने झुंजार साथ दिली. रोहनच्या हाताच्या जखमेवर तीन टाके होते, वेदना होत असूनही त्याने टिच्चून फलंदाजी करताना ६६ चेंडू किल्ला लढविला. गोव्याने दुसऱ्या डावात ९ बाद २६४ धावा केल्या. प्रकृती अस्वास्थामुळे वैभव गोवेकर फलंदाजीस उतरला नाही.

योगेशने प्रचंड संयम प्रदर्शित करताना २०६ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ८० धावा केल्या. त्याने रोहनच्या साथीत आठव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. छत्तीसगडला विजयासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले. स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविण्यासाठी पाहुण्या संघाला तीन विकेटचे मोल द्यावे लागले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः २०७ व दुसरा डाव (६ बाद १८० वरून) ः ९७.३ षटकांत ९ बाद २६४ (योगेश कवठणकर ८०, कौशल हट्टंगडी १०, रोहन बोगाटी १६, शुभम तारी नाबाद ०, स्नेहिल चड्डा २-६३, दीपक सिंग ३-६६, उत्कर्ष तिवारी ३-२९) पराभूत वि. छत्तीसगड, पहिला डाव ः ३८२ व दुसरा डाव ः १९ षटकांत ३ बाद ९२ (प्रतीक यादव २९, हर्ष शर्मा नाबाद ३५, गगनदीप सिंग नाबाद १६, कीथ पिंटो ९-०-३८-१, शुभम तारी ४-०-२५-१, दीप कसवणकर १-०-६-०, योगेश कवठणकर ४-०-११-१, यश पोरोब १-०-८-०).

दृष्टिक्षेपात...

- छत्तीसगडचे स्पर्धेत २ विजय, अन्य २ सामने अनिर्णित, १८ गुण

- गोव्याचे स्पर्धेत ३ पराभव, १ लढत अनिर्णित, ३ गुण

- गोव्याचा पुढील सामना २९ जानेवारीपासून सांगे येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT