Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

Cheteshwar Pujara चा इंग्लंडमध्ये जलवा! तिसऱ्या शतकासह सचिन, गावसकरांच्या रेकॉर्डची बरोबरी

चेतेश्वर पुजाराने ससेक्सची कॅप्टन्सी करताना तिसरे शतक करत मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Cheteshwar Pujara Century: भारतात एकिकडे आयपीएलचा रोमांच सुरू असताना चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत खेळत आहे. त्याने या स्पर्धेत त्याची अविश्वसणीय लय कायम ठेवताना पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. त्याने ससेक्स संघाचे नेतृत्व करताना चालू हंगामात तिसरे शतक साकारले आहे.

पुजाराने शुक्रवारी वूस्टरशायरविरुद्ध शतकी खेळी केली. हे त्याची गेल्या चार सामन्यातील तिसरे शतक आहे. त्याने ससेक्ससाठी पहिल्या डावात १८९ चेंडूत १३६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १९ चौकार आणि १ षटकार मारला. त्याने १३८ चेंडूत त्याचे शतक केले होते.

त्याच्या या खेळीदरम्यान त्याने ससेक्सकडूनच खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथबरोबर चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची महत्त्वाची भागीदारीही केली. स्मिथ ३० धावा करून बाद झाला. एफजे हडसन-प्रेंटिसने ५४ धावांची खेळी केली. त्यामुळे ससेक्सने पहिल्या डावात सर्वबाद ३७३ धावा केल्या आणि 109 धावांची आघाडी घेतली.

तत्पूर्वी वूस्टरशायरचा संघ २६४ धावांवर सर्वबाद झाला होता. ससेक्सकडून ऑली रॉबिन्सनने ७ विकेट्स घेतल्या.

पुजाराचे तिसरे शतक

पुजाराने याआधी डर्हमविरुद्ध ११५ आणि ३५ धावांची खेळी केली होती. तसेच ग्लुसेस्टरशायरविरुद्ध त्याने २३८ चेंडूत २० चौकार आणि २ षटकारांसह १५१ धावांची खेळी केली होती. त्याला यॉर्कशायर विरुद्ध मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. आता त्याने वूस्टरशायरविरुद्धची शतकी खेळी केली आहे.

दरम्यान, ससेक्सकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारा आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. कारण हे दोघे ससेक्सकडून एकत्र खेळत असले तरी ७ जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात हे दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील.

पुजाराचा विक्रम

पुजाराने वूस्टरशायरविरुद्ध शतकी खेळी करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९ हजार धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. असा कारनामा करणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सुनील गावसकर (25,834 धावा), सचिन तेंडुलकर (25,396), राहुल द्रविड (23,794 धावा), व्हीव्हीएस लक्ष्मण (19,730 धावा) आणि वासिम जाफर (19,410) यांनी हा कारनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT