Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

Cheteshwar Pujara: पुजाराची भरारी! 20 हजार धावा करत सचिन-गावसकारांचा मांदियाळीत सामील

Most runs in First Class Cricket: चेतेश्वर पुजाराने 20 हजार धावांचा टप्पा पार करत सचिन-गावसकरांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

Pranali Kodre

Cheteshwar Pujara becomes the 4th Indian batter to reach 20 thousand First-Class runs:

भारतात सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत 19 ते 21 जानेवारी 2024 दरम्यान नागपूरला विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र सामना झाला. या सामन्यात सौराष्ट्रने 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला. याच सामन्यात सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने एका मोठा विक्रमाला गवसणी घातली आहे.

त्याने या सामन्यात पहिल्या डावात 43 आणि दुसऱ्या डावात 66 धावा केल्या. त्यामुळे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत 20 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा भारताचा फक्त चौथाच खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी केवळ सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि राहुल द्रविड या तीनच भारतीय खेळाडूंना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार करता आला आहे.

या सामन्यापूर्वी पुजाराला 20 हजार धावा करण्यासाठी 96 धावांची गरज होती. त्याने विदर्भाविरुद्ध 109 धावा केल्याने 20 हजार धावांचा टप्पा पूर्ण झाला.

पुजाराच्या आता 260 प्रथम श्रेणी सामन्यात 50 पेक्षा जास्त सरासरीने 20013 धावा झाल्या आहेत. यामध्ये 61 शतकांचा आणि 78 अर्धशतकांचा समावेश आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर सुनील गावसकर आहेत. त्यांनी 25834 धावा केल्या आहेत. तसेच सचिन तेंडुलकर 25396 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर राहुल द्रविड 23794 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पुजाराने झारखंडविरुद्ध 243 धावांची खेळी केली होती. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 17 वे द्विशतक होते. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा द्विशतक करणारा भारतीय खेळाडू आहे.

सौराष्ट्रचा विजय

दरम्यान नागपूरला झालेल्या सामन्यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना 58.4 षटकात सर्वबाद 206 धावा केल्या होत्या. तसेच नंतर विदर्भाचा पहिला डाव 33.5 षटकात 78 धावांवर संपुष्टात आला.

दुसऱ्या डावात सौराष्ट्रने सर्वबाद 244 धावा केल्या आणि पहिल्या डावातील 128 धावांच्या आघाडीसह विदर्भासमोर 373 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाचा दुसरा डाव 45.2 षटकात 134 धावांवरच संपुष्टात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT