Bhakti Kulkarni Goa Dainik Gomantak
क्रीडा

Chess Olympiad 2022 : भारतीय महिला संघासाठी खेळणं हे माझं भाग्यच

बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये ब्राँझपदक विजेत्या भारतीय महिला संघाची भक्ती कुलकर्णी सदस्य

किशोर पेटकर

Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये ऐतिहासिक ब्राँझपदक जिंकलेल्या भारत-अ संघाच्या कामगिरीत वाटा उचलण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला खूप भाग्यवान समजते, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया गोव्याची इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी हिने `गोमन्तक`ला दिली.

भारत-अ महिला संघाने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये प्रथमच पदकाची कमाई केली. स्पर्धा चेन्नईजवळील मामल्लापुरम येथे झाली. ब्राँझपदक विजेत्या संघात भक्तीसह कोनेरू हंपी, द्रोणवल्ली हरिका, आर. वैशाली व तानिया सचदेव यांचा समावेश होता.

भक्ती म्हणाली, ``बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताच्या महिला संघाला पहिलेवहिले पदक मिळाले, या कामगिरीबद्दल मी खूप आनंदित आहे. जागतिक बुद्धिबळात ही स्पर्धा अतिशय मानाची आहे. या स्पर्धेतील पदक विजेत्या संघात माझा समावेश असणे ही सुद्धा मोठी भाग्याची बाब आहे.``

अंतिम सामना गमावल्याची खंत

बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारत-अ संघ महिला गटात दहाव्या फेरीपर्यंत आघाडीवर होता. शेवटच्या लढतीत अमेरिकेने सनसनाटी विजय नोंदविला आणि भारतीय महिलांना ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. याविषयी भक्ती म्हणाली, ``स्पर्धेच्या दहाव्या फेरीपर्यंत अग्रस्थानी राहूनही अखेरच्या फेरीत पराभूत होणे अत्यंत क्लेषदायक होते. आमच्या प्रतिस्पर्धी संघाने अप्रतिम खेळ केला, त्यामुळे आम्हाला ब्राँझपदकावर राहावे लागले.``

भविष्यातही चांगल्या कामगिरीचा विश्वास

बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील पदकानंतर भक्तीने आगामी कालखंडात चांगल्या कामगिरीचा विश्वास प्रकट केला. तिने सांगितले, ``बुद्धिबळ ऑलिंपियाडमुळे देशात बुद्धिबळज्वर जाणवला. वैयक्तिक पातळीवर भविष्यातही चांगली कामगिरी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ऑलिंपियाडमध्ये मी पाचपैकी चार सामने जिंकले.``

तमिळनाडू सरकारचे एक कोटी रूपये

44व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खुल्या (पुरुष) गटात भारत-ब संघाने, महिला गटात भारत-अ संघाने ब्राँझपदक जिंकल्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पदकविजेत्या चमूसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश दिल्याची माहिती भक्तीने दिली.

44व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भक्ती

- एकूण 5 डाव, 4 विजय, 1 पराभव

- वि. वि. म्युत्रिबा होतामी (ताजिकिस्तान)

- वि. वि. मारिया बेलेन सार्किस (अर्जेंटिना)

- वि. वि. अक्षया कालैयालाहान (इंग्लंड)

- वि. वि. नाखबायेवा गुलिसखान (कझाखस्तान)

- पराभूत वि. तातेव अब्राहम्यान (अमेरिका)

भक्तीचे दोन वर्षांतील सांघिक यश

1.कोविड-19 मुळे 2020 मध्ये झालेल्या ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताला रशियासह संयुक्त सुवर्णपदक

2. 2021 मधील ऑनलाईन ऑलिंपियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाला ब्राँझपदक

3. ऑनलाईन पद्धतीने 2020 मध्ये झालेल्या आशियाई महिला सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

4. 2021 साली स्पेनमध्ये प्रत्यक्ष बोर्डवरील (ऑफलाईन) जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरी गाठत भारताची ऐतिहासिक रौप्यपदक कमाई

5. 2021 मध्ये ऑनलाईन सुपर लीग बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय महिला अव्वल

6. चेन्नईत 44व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारतीय महिलांना प्रथमच ऐतिहासिक ब्राँझपदक

भक्तीचे प्रमुख किताब

  • 2012 मध्ये गोव्याची पहिली वूमन ग्रँडमास्टर

  • 2019 मध्ये इंटरनॅशनल मास्टर किताबावर शिक्कामोर्तब

  • 2011-12 मध्ये गोवा सरकारच्या दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्काराची मानकरी

  • 2005 मध्ये राज्य सरकारच्या बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर पुरस्कारप्राप्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

Vaibhav Mangle At IFFI: वैभव मांगलेनी गोव्याचे केले कौतुक; म्हणाले की 'सुंदर वातावरणात....'

IFFI Goa 2024: अम्मास प्राईड ठरला चित्रपट महोत्सवातील एकमेव LGBTQ सिनेमा; "सामाजिक बदल घडवायचे आहेत" नवख्या दिग्दर्शकाचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT