Tushar Deshpande Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: CSK चा 'हा' खेळाडू ठरला पहिला 'इम्पॅक्ट प्लेअर', अंबाती रायुडूला केलं रिप्लेस

Pranali Kodre

Impact Player in IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. गुजरातच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअरचा नियम वापरण्यात आला होता.

खरंतर आयपीएल २०२३ स्पर्धेत पहिल्यांदाच इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात त्याचा वापरही झालेला दिसला. या नियमाचा सर्वात आधी सीएसकेने वापर केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजीला उतरताना सीएसकेने अंबाती रायुडूचा बदली खेळाडू म्हणून तुषार देशपांडेचा सामन्यात समावेश केला. त्यामुळे तुषार आयपीएलमधील पहिला इम्पॅक्ट प्लेअर ठरला. त्याच्या संघात येण्याने सीएसकेला गोलंदाजीसाठी ज्यादाचा पर्याय मिळाला. मात्र, तो या सामन्यात चांगलाच महागडा ठरला. त्याने १२ पेक्षा अधिकच्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या.

तसेच सीएसकेनंतर गुजरातनेही या नियमाचा वापर केला. गुजरातने दुखापतग्रस्त केन विलियम्सनच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शनला इम्पॅक्ट प्लेअरचा नियम वापरत फलंदाजीला पाठवले. दरम्यान, सुदर्शनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १७ चेंडूत २२ धावांची खेळी केली.

नक्की काय आहे इम्पॅक्ट प्लेअरचा नियम

इम्पॅक्ट प्लेअरचा नियम वापरून संघ गरज पडेल, तेव्हा प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला सामन्यात सामील करू शकतात. सामन्याच्या कोणत्याही क्षणी इम्पॅक्ट प्लेअरला सामील केला जाऊ शकतो. दरम्यान, ज्या खेळाडूला बदली केले गेले आहे, त्या खेळाडूला नंतर सामन्यात कोणतीही भूमिका निभावता येणार नाही.

तसेच प्रत्येक संघ प्लइंग इलेव्हनमध्ये केवळ ४ परदेशी खेळाडूंनाच संधी देऊ शकत असल्याने जर आधीच प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ परदेशी खेळाडू असतील, तर इम्पॅक्ट प्लेअर भारतीयच असणे आवश्यक असणार आहे. जर प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन किंवा त्यापेक्षा कमी परदेशी खेळाडू असतील, तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी खेळाडूला वापरता येणे शक्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT