MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: CSK ने वाढवली फॅन्सची धडधड! 7 वाजून 29 मिनिटांनी शेअर केला कॅप्टनकूलचा 'तो' व्हिडिओ

चेन्नई सुपर किंग्सने गुरुवारी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी धोनीचा एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना टेंशन दिले होते.

Pranali Kodre

MS Dhoni Video: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल नेहमीच चर्चा होत राहते. आता नुकताच त्याचा एक व्हिडिओ तो आयपीएलमध्ये खेळत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांची मात्र धडधड वाढली होती.

चेन्नईने गुरुवारी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी धोनीचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये धोनी नेट्समध्ये मोठमोठे शॉट्स मारताना दिसत आहे. या व्हिडिओला चेन्नईने 'थाला अपडेट 7:29' असे कॅप्शन टाकले आहे.

हे कॅप्शन आणि व्हिडिओ शेअर करण्याची वेळ पाहून चाहत्यांचे टेंशन वाढले. कारण 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला होता. तसेच त्यानंतर साधारण एक वर्षांनी धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

चेन्नईचा सुरू झाला सराव

आयपीएल 2023 हंगाम येत्या 31 मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामासाठी चेन्नई संघाचे सराव शिबिर गेल्या आठवड्यात चेन्नईमध्ये सुरू झाले आहे. या शिबिरात चेन्नई संघातील अनेक खेळाडू सामील झाला आहेत. यामध्ये धोनीचाही समावेश आहे.

चेन्नईला या आयपीएल हंगामातील सलामीचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 31 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तसेच यंदा चेन्नईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदमंबरम स्टेडियमवर 3 वर्षांनी सामना खेळणार आहे. त्यांनी यापूर्वी 2019 मध्ये या मैदानावर सामने खेळले होते.

दरम्यान, यंदाचा आयपीएल हंगाम धोनीचा अखेरचा हंगाम असू शकतो, अशी सध्या चर्चा सुरू आहे. असे म्हटले जात आहे की धोनी या आयपीएल हंगामानंतर सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. त्याने आत्तापर्यंत चेन्नईने आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 4 वेळा आयपीएल विजेतेपदही जिंकले आहे.

पण, आता धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार कोण होणार, याबद्दलही चर्चांना उधाण आले आहे. गेल्यावर्षी धोनीने रविंद्र जडेजाकडे चेन्नईचे कर्णधारपद सोपवले होते. पण जडेजाने हंगामाच्या अर्ध्यातर हे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने धोनीने पुन्हा ही जबाबदारी खांद्यावर घेतली होती.

त्यामुळे आता यंदाच्या हंगामात धोनी कर्णधार म्हणूनच खेळणार की दुसऱ्या खेळाडूकडे ही जबाबदारी सोपवणार हे पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT