Hardik Pandya | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पहिल्या मॅचआधी जगातील सर्वात मोठ्या मैदानात धोनी-हार्दिकची झोकात एन्ट्री, पाहा Video

आयपीएल 2023 स्पर्धेतील सामन्यापूर्वी एमएस धोनी आणि हार्दिक पंड्या यांची मैदानात स्टाईलमध्ये एन्ट्री झाली

Pranali Kodre

IPL 2023 Opening Ceremony: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला शुक्रवारपासून (31 मार्च) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमवर असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा याच मैदानावर पार पडला.

उद्घाटन सोहळ्याच्या अखेरीस बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाल असे काही अधिकाही स्टेजवर आले होते. तसेच उद्घाटन सोहळ्याचे निवेदन करणाऱ्या मंदीरा बेदीने यावेळी सीएसके आणि गुजरात टायटन्स या संघांच्या कर्णधारांनाही आमंत्रित केले.

यावेळी एका रथासारख्या गाडीतून एमएस धोनी आणि हार्दिक पंड्या यांनी प्रवेश केला. ते स्टेजवर येत असताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या लाखो चाहत्यांनी जल्लोष केला होता. दरम्यान, धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याची चर्चा सध्या सुरू असल्याने त्याच्या नावाने बराचवेळ स्टेडियममध्ये जल्लोष होत होता. या क्षणांचे व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत. तसेच अनेक युजर्सनेही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, धोनी आणि हार्दिक स्टेजवर आल्यानंतर त्यांनी आयपीएल 2023 ट्रॉफीसह आणि फोटोशूट केले. यापूर्वी या उद्घाटन सोहळ्यात अरिजीत सिंग, तमन्ना भाटीया आणि रश्मिका मंदाना यांचे परफॉर्मन्स झाले.

अरिजीत सिंगने परफॉर्म केले. त्याने 'ए वतन, मेरे वतन', लेहरा दो, केसरिया, देवा-देवा, चन्ना मेरे, कबीरा, अपना बना ले पिया, झुमे जो पठाण, शिवा, इंडिया जितेगा असे अनेक गाणी गायली. तसेच रश्मिकाने श्रीवल्ली, नाटू नाटू अशा गाण्यांवर परफॉर्म केले, तर तमन्नाने टम टम, ऊ अंटावां अशा गाण्यांवर परफॉर्मन्स दिला.

दरम्यान, हा हंगाम अनेक गोष्टींमुळे खास ठरणार आहे. तब्बल तीन वर्षांनंतर यंदा साखळी फेरी होम - अवे पद्धतीने पार पडणार आहे, म्हणजेच संघ घरच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात सामने खेळताना दिसणार आहेत. तसेच या आयपीएल हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नियमही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघ गरज पडेल, तेव्हा प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला सामन्यात सामील करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT