Chamika Karunaratne Dainik Gomantak
क्रीडा

Viral Cricket Video: ऐकावं ते नवलंच! कॅच घेताना श्रीलंकन क्रिकेटरचे तुटले 4 दात

लंका प्रीमीयर लीगमध्ये सामन्यादरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात श्रीलंकन अष्टपैलूचे दात तुटले

Pranali Kodre

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा विचित्र घटना घडल्या आहेत. आता यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. श्रीलंकेच्या चमिका करुणारत्नेच्या तोंडाला झेल घेण्याच्या प्रयत्नात इजा झाली. चेंडू लागल्याने त्याचे दातही पडले. ही घटना सध्या सुरू असलेल्या लंका प्रीमीयर लीगदरम्यान झाली.

बुधवारी लंका प्रीमीयर लीग स्पर्धेत कँडी फाल्कन विरुद्ध गॉल ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात फाल्कन संघाकडून करुणारत्ने खेळत होता. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ग्लॅडिएटर्स संघाकडून नुवानिडो फर्नांडोने चौथ्या षटकात कव्हर्सच्या दिशेने मोठा फटका खेळला. पण, त्याचा फटका चुकला.

त्यामुळे करुणारत्ने झेल घेण्यासाठी गेला. मात्र, तो चेंडू त्याच्या तोंडावर जोरात आदळला. त्यामुळे त्याच्या ओठांमधून रक्त येत असल्याचेही दिसले. त्याला त्यानंतर लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार चेंडू लागल्याने त्याचे चार दातही पडले आहेत. पण असे असले तरी त्याने हा झेल पूर्ण केला आणि फर्नांडो बाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Chamika Karunaratne lost four teeth while fielding in a Lanka Premier League match)

सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने करुणारत्ने पुढे खेळण्यासाठी मैदानात उतरला नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी फाल्कन संघाने 22 वर्षीय चामिंदू विजेसिंघे याची संघात बदली खेळाडू म्हणून निवड केली. पण चामिंदूला गोलंदाजी आणि फलंदाजीची संधी मिळाली नाही.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास फाल्कन संघाने हा सामना सहज जिंकला. ग्लॅडिएटर्सला 20 षटकांत 8 बाद 121 धावाच करता आल्या. त्यामुळे 122 धावांचे आव्हान फाल्कन संघाने 15 षटकांमध्येच 5 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि सामना आपल्या नावावर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT