कर्णधार सुयश प्रभुदेसाई Dainik Gomantak
क्रीडा

फक्त कर्णधार सुयशच झुंजला...

गोव्याच्या गोलंदाजाचा दिशा, टप्पा हरवल्याने राजस्थानचे फावले

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या गोलंदाजांचा दिशा आणि टप्पा हरवल्यामुळे राजस्थानच्या (Rajasthan) फलंदाजांचे फावले. त्यांनी 324 धावांचे आव्हान दिल्यानंतर फक्त कर्णधार सुयश प्रभुदेसाई (नाबाद 94) लढला, पण त्याची झुंजही अखेरीस अपयशी ठरली आणि 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटात गोव्याला पहिलाच पराभव पत्करावा लागला.

पुदुचेरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अगोदरच्या लढतीत हरियानादिल्लीस (Haryana and Delhi) पराभूत केलेल्या गोव्याला आज धक्का बसला. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजीचा (bowling) खरपूस समाचार घेतला. त्यांनी निर्धारित 50 षटकांत 7 बाद 323 धावा केल्या. गोव्याच्या निहाल सुर्लकर याने दोन गडी बाद केले, पण त्याच्या 10 षटकांत तब्बल 84 धावा निघाल्या. फक्त फिरकी गोलंदाज धीरज यादव यानेही किफायशीर गोलंदाजी टाकली. पाऊस आला तेव्हा गोव्याच्या डावात 32.1 षटकांत 8 बाद 173 धावा झाल्या होत्या. अखेरीस व्हीजेडी पद्धतीनुसार राजस्थानला 103 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. गोव्याचा स्पर्धेतील शेवटचा सामना शुक्रवारी पंजाबविरुद्ध होईल.

दिल्लीविरुद्ध नाबाद 58 धावा केलेल्या गोव्याचा कर्णधार सुयश प्रभुदेसाई याने कालचीच खेळी पुढे नेली, पण त्याला सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही. पाऊस आल्यामुळे सुयशचे शतक सहा धावांनी हुकले. त्याने 75 चेंडूंतील खेळीत 9 चौकार व 7 षटकार मारले. सुयशने पाचव्या विकेटसाठी संकेत मोरजकर (13) याच्यासमवेत 58 धावांची भागीदारी केली. अगोदरच्या दोन लढतीत चमकदार फलंदाजी केलेले मंथन खुटकर (2) व कश्यप बखले (14) लवकर बाद झाल्यामुळे त्यामुळे गोव्यासाठी सव्वातीनशेच्या आसपास धावांचे आव्हान खूपच कठीण ठरले.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान: 50 षटकांत 7 बाद 323 (डी. ए. अगरवाल 39 , अंशुल गढवाल 49-53 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, वाय. डी. सिंग 76-58 चेंडू, 7 चौकार, 6 षटकार, एस. एस. धिवन नाबाद 76-46 चेंडू, 5 चौकार, 6 षटकार, हेरंब परब 10-0-59-2 समित आर्यन मिश्रा 10-1-50-2 धीरज यादव 10- 1-35-0 निहाल सुर्लकर 10-0-84-2 सुयश प्रभुदेसाई 4-0-41-0 वेदांत नाईक3-0-29-0 संकेत मोरजकर 3-0-25-1 वि. वि. (व्हीजेडी पद्धत)

गोवा : 32.1 षटकांत 8 बाद 173 (आदित्य सूर्यवंशी 33 , मंथन खुटकर 2 , कश्यप बखले 14 , सुयश प्रभुदेसाई नाबाद 94-75 चेंडू, 9 चौकार, 7 षटकार, आलम खान 2, संकेत मोरजकर 13 , वेदांत नाईक 2 , निहाल सुर्लकर 2, धीरज यादव 0 , हेरंब परब नाबाद 0, ए. एम. माथूर 1-37 , एम. जे. सुथार 2-33, एस. एस. धिवन 3-30 , रोहित खिचर 2-32)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT