टीम इंडिया (Team India) जुलैमध्ये श्रीलंका (Sri Lanka) दौर्यावर जाणार आहे. तेथे भारत आणि यजमान देश यांच्यात तीन एकदिवसीय (ODI) सामन्यांची आणि तीन टी -20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurabh Ganguly) यांनीही या मालिकेस सहमती दर्शविली होती, तर श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने या दौऱ्याबाबत दुजोरा दिला होता. आता सद्यस्थिती पाहिल्यास मालिका होणार की नाही हे प्रश्नचिन्ह आहे. वास्तविक, श्रीलंकेतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि अशा परिस्थितीत काहीही होऊ शकते. श्रीलंकेत, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि लोक मरत देखील आहेत. अशा परिस्थितीत याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, टीम इंडियाचा दौरा रद्द होऊ शकेल म्हणून श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अधिकारीही चिंतेत आहेत. श्रीलंका क्रिकेट, एसएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅश्ले डी सिल्वा यांनीही कबूल केले की कोविड -19 पासून संसर्गित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. तथापि, भारतीय संघाच्या दौर्यापर्यंत परिस्थती ठीक होईल आणि त्यानंतर क्रिकेट मालिकेसाठी मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.(Can Indian team's tour of Sri Lanka be canceled)
कोविड -19 रुग्णांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे, परंतु श्रीलंकन बोर्डाने यापूर्वी इंग्लंड आणि इतर संघांमध्येही यजमानपद यशस्वीरित्या पार पडले आहे असे श्रीलंकेचे क्रिकेट सीईओ अॅश्ले डी सिल्वा म्हणाले. त्यावेळीही कोविडचे रुग्ण समोर येत होते. आम्हाला खात्री आहे की आम्ही भारताला यशस्वीरित्या होस्ट करू असेही ते पुढे म्हणाले. आम्हाला फक्त एवढेच पाहिजे आहे की या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये. ही प्रस्तावित क्रिकेट मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्यास टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू यात सामील होणार नाहीत कारण ते इंग्लंड दौर्यावर असतील असेही डी सिल्वा यांनी नमूद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.