Team India ANI
क्रीडा

IND vs ENG: भारतीय संघ अश्विनचा बदली खेळाडू घेऊ शकतात? काय आहेत सब्सस्टीट्यूटचे नियम, जाणून घ्या

Pranali Kodre

What are rules for substitute fielder and Replacement player:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. राजकोटला होत असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला.

भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर कुटुंबात मेडिकल एमर्जन्सी आल्याने तातडीने चेन्नईला घरी परतला आहे. त्यामुळे तो आता राजकोट कसोटीत खेळणार नाही.

त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून केवळ चार प्रमुख गोलंदाजांसह 10 खेळाडू खेळताना दिसत आहेत, तर बदली क्षेत्ररक्षक मैदानावर होता. पण यामागील नियम नक्की काय आहेत, याबद्दल थोडक्यात आढावा घेऊ.

बदली क्षेत्ररक्षकाचा नियम

क्रिकेटच्या नियमांचे जतन करणारी संस्था मेरिलबोल क्रिकेट क्लबच्या (MCC) नियमावलीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. यातील 24 व्या नियमात बदली क्षेत्ररक्षकाबद्दल (Substitute Fielder) सांगण्यात आले आहे. या नियमानुसार बदली क्षेत्ररक्षकाला मैदानात येण्याची परवानगी पंचांकडून दिली जाते.

नियम क्रमांक 24.1.1.1 आणि 24.1.1.2 नुसार जर सामन्यादरम्यान प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणारा खेळाडू दुखापतग्रस्त झाला असेल किंवा आजारी असेल, याचे कारण पंचांना योग्य वाटले किंवा जर अनुपस्थितीमागे पूर्ण समाधानकारक कारण असेल, तरच पंच त्या खेळाडूच्या जागेवर बदली क्षेत्ररक्षकाला मैदानात येण्याची परवानगी देतात.

तसेच 24.1.2 नियमानुसार बदली खेळाडू गोलंदाजी किंवा नेतृत्व करू शकत नाही. पण बदली खेळाडू पंचांच्या परवानगीने यष्टीरक्षण करू शकतो.

दरम्यान, प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडू पुन्हा खेळायला आल्यानंतर त्याला गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करण्याची परवानगी असते, परंतु गोलंदाजी करण्यापूर्वी त्याला तो जितका वेळ बाहेर होता, तितक्या वेळाचा पेनल्टी म्हणून मिळालेला वेळ मैदानात घालवावा लागतो.

Substitute Fielders Law

अश्विनच्या जागी बदली खेळाडू घेता येणार?

खंरतर एखाद्या खेळाडूच्या जागेवर पूर्णपणे बदली खेळाडू तेव्हाच घेता येतो, जेव्हा प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडू मैदानात असताना त्याला जर कन्कशनच्या दुखापतीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्याच्या संघाला त्याच्या जागेवर बदली खेळाडू घेता येतो, जो फक्त क्षेत्ररक्षणच नाही, तर फलंदाजी आणि गोलंदाजी देखील करू शकतो.

तथापि, कन्कशन व्यतिरिक्त एखाद्या खेळाडूचा पूर्ण बदली खेळाडू संघात घ्यायचा असेल, तर त्यासाठी त्या खेळाडूच्या संघाला प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराकडे अधिकृत विनंती करावी लागते. याबद्दलची माहिती एमसीसीच्या पहिल्याच नियमात दिली आहे.

नियम क्रमांक 1.2.1 नुसार नाणेफेकीपूर्वीच कर्णधार सामन्यात खेळणाऱ्या ११ खेळाडूंची नावे पंचांकडे सुपूर्त करतात. 1.2.2 नियमानुसार एकदा पंचांकडे नावे दिल्यानंतर त्यातील खेळाडूला प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने परवानगी दिल्याशिवाय बदलता येत नाही.

तसेच 1.2.3 नियमानुसार जर प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूसाठी बदली खेळाडू (Replacement Player) घेण्याची परवानगी प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने दिली, तरी जर प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूने एखाद्या डावात फलंदाजी केली असेल, तर तो बदली खेळाडू पुन्हा त्या डावात फलंदाजी करू शकत नाही. तसेच प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूवर लावण्यात आलेली पेनल्टी, वॉर्निंग आणि निलंबन बदली खेळाडूवरही कायम करण्यात येते.

MCC Replacement Player Rule

यानुसार आता जरी अश्विनसाठी बदली खेळाडू घ्यायचा विचार केला, तरी भारतीय संघाला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडे यासाठी विनंती करावी लागेल, तसेच जर स्टोक्सने ही विनंती मान्य केली, तर भारतीय संघ अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदरला अश्विनच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT