Cameron Cuffy Dainik Gomantak
क्रीडा

ODI Record: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अजब रेकॉर्ड! शून्य धावा, शून्य विकेट्स; तरीही तो ठरला 'मॅन ऑफ द मॅच'!

Cameron Cuffy Unique ODI Record: क्रिकेटच्या मैदानात सामान्यतः 'सामनावीर' हा किताब सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला किंवा जास्तीत जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजाला दिला जातो.

Manish Jadhav

Cameron Cuffy Unique ODI Record: क्रिकेटच्या मैदानात सामान्यतः 'सामनावीर' हा किताब सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला किंवा जास्तीत जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजाला दिला जातो. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एकदा असाही प्रसंग घडला, जेव्हा एका अशा खेळाडूला हा पुरस्कार देण्यात आला ज्याने ना एकही धाव काढली, ना एकही बळी घेतला आणि साधा झेलही पकडला नाही. ही अजब घटना 2001 मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या एका एकदिवसीय सामन्यात घडली होती, ज्याची चर्चा आजही क्रिकेट जगतात केली जाते.

जून 2001 मध्ये हरारे क्रिकेट स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने होते. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 5 बाद 266 धावांचा टप्पा गाठला होता. डॅरेन गंगा (66), ख्रिस गेल (53) आणि शिवनारायण चंद्रपॉल (51) यांच्या अर्धशतकी खेळींमुळे वेस्ट इंडिजला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ मैदानात उतरला तेव्हा सलामीवीर ॲलिस्टर कॅम्पबेलने 68 धावांची झुंजार खेळी केली, मात्र इतर फलंदाजांच्या अपयशामुळे झिम्बाब्वेचा डाव 9 बाद 239 धावांवर आटोपला आणि वेस्ट इंडिजने हा सामना 27 धावांनी जिंकला.

सामन्यानंतर जेव्हा 'प्लेयर ऑफ द मॅच'ची घोषणा झाली, तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या. हा पुरस्कार कॅमरुन कॉफी या खेळाडूला देण्यात आला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सामन्यात कॉफीची फलंदाजी आली नव्हती कारण वेस्ट इंडिजचे (West Indies) केवळ 5 गडी बाद झाले होते. गोलंदाज म्हणून त्यांनी 10 षटके टाकली होती, पण त्यांना एकही बळी मिळवता आला नव्हता. इतकेच नाही तर क्षेत्ररक्षण करताना त्यांनी एकही झेल टिपला नव्हता. मग प्रश्न असा निर्माण झाला की, मार्विन ढिल्लनसारख्या गोलंदाजाने 3 बळी घेतलेले असताना कॉफीला हा पुरस्कार का मिळाला?

याचे मुख्य कारण होते कॅमरुन कॉफी यांची अत्यंत 'कंजूष' किंवा किफायतशीर गोलंदाजी. त्यांनी आपल्या 10 षटकांच्या कोट्यात केवळ 20 धावा दिल्या होत्या, ज्यामध्ये 2 षटके निर्धाव (Maiden) होती. त्यांच्या या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दबाव निर्माण झाला आणि त्यांना हवी तशी धावगती राखता आली नाही. 3 बळी घेणाऱ्या ढिल्लन यांनी 10 षटकांत 48 धावा दिल्या होत्या, ज्या त्या काळाच्या हिशोबाने जास्त मानल्या गेल्या. केवळ धावगती रोखून धरल्याच्या जोरावर आणि अत्यंत कमी इकॉनॉमी रेटमुळे कॅमरुन कॉफी यांना सामनावीर घोषित करण्यात आले. क्रिकेटमधील हा एक असा अभावानेच पाहायला मिळणारा विक्रम आहे, जो कॉफी यांच्या नावावर कायमचा कोरला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT