Camel Flu | FIFA World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022 वर 'कॅमल फ्लू'चे संकट!चाहत्यांनी रहावे जागृत

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेवर 'कॅमल फ्लू'चे संकट आहे.

गोमन्तक डिजिटल टीम, दैनिक गोमन्तक डिजिटल

Camel Flu in Qatar : कतारमध्ये सध्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 चा थरार सुरू आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक रोमांचकारी सामने आत्तापर्यंत पाहायला मिळाले असून लाखो चाहतेही या सामन्यांची मजा घेताना दिसले आहेत. पण याचदरम्यान आता मोठे संकट उभे राहिल्याचे समोर येत आहे.

कतारमध्ये 'कॅमल फ्लू'च्या (Camel Flu) साथीचा धोका असल्याची चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ञांनी दिली आहे. फिफा वर्ल्डकप पाहायला जवळपास 1.2 दशलक्ष चाहते कतार आले असल्याचे रिपोर्ट्स सांगतात. अशात कॅमल फ्लूची साथ वेगाने पसरू शकते. त्यामुळे चाहत्यांना जागृत राहणे महत्त्वाचे आहे.

कॅमल फ्लू हा कोव्हिडपेक्षाही अधिक प्राणघातक व्हायरस असल्याचे म्हटले जात आहे. न्यू मायक्रोब्स अँड न्यू इन्फेक्शन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की कतारमध्ये फिफा वर्ल्डकप पाहाण्यासाठी मोठ्याप्रमाणात चाहते येत असल्याने अपरिहार्यपणे संभाव्य संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे खेळाडू, चाहते आणि स्थानिकांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार कॅमल फ्लूची भविष्यात साथही येऊ शकते. दरम्यान, वर्ल्डकपसाठी (FIFA World Cup) कतारमध्ये आलेल्या चाहत्यांना उंटांना स्पर्श करण्याचे टाळण्यास सांगण्यात आले आहे. उंट या प्राणघातक संसर्गाचे मूळ म्हणून ओळखले जातात. कॅमल फ्लू सर्वात पहिल्यांदा 2012 मध्ये सौदी अरेबियामध्ये आढळला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत 27 देशांमध्ये मिळून या रोगाची 2600 प्रकरणे आढळली असून 935 मृत्यू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT