Pelé Dainik Gomantak
क्रीडा

Pelé: वयाच्या 17 व्या वर्षीच विश्वविजेता ते फुटबॉलचा देव

पेले यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा

Pranali Kodre

Pele: ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे कर्करोगाने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर त्यांनी गुरुवारी रात्री उशीरा वयाच्या 82 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. पेले हे फुटबॉल विश्वातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक समजले जात होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले आहे. त्याचमुळे त्यांची लोकप्रियता जगभरात पसरली होती.

पेले यांचे पूर्ण नाव एडसन अरांतेस दो नासिमेंटो. त्यांचा जन्म झाला 23 ऑक्टोबर 1940 रोजी मिनास गेरेइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. विशेष म्हणजे त्यांचे नाव महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या नावाचा किस्सा असा झाला की त्यांच्या जन्माची नोंदणी करताना कर्मचाऱ्याने त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये 'I' लिहिलाच नाही. त्यामुळे त्यांचे नाव एडसन (Edson) असे नोंदवले गेले.

पण, त्यांना पेले हे नाव मिळाले कारण लहानपणी त्यांच्या शहराकडून खेळणारा बिले या गोलरक्षकाचे नाव त्यांना घेता येत नसे, त्यामुळे ते त्याला पेले असे म्हणायचे. त्यामुळे त्याला नाव उच्चारता येत नाही, म्हणून त्यांचे संघसकारी खिल्ली उडवायचे. त्याचमुळे पुढे त्यांना पेले हे नाव मिळाले आणि हेच नाव पुढे जगभरात गाजले.

त्यांनी ब्राझील संघाकडून 1957 साली खेळायला सुरुवात केली. त्यांना लगेचच 1958 साली स्विडनमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्येही खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी ते केवळ 17 वर्षांचे होते. त्यावेळी ब्राझीलने तो वर्ल्डकपही जिंकला होता. त्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात त्यांनी गोलही नोंदवलेला. त्यामुळे ते वर्ल्डकप जिंकणारे आणि अंतिम सामन्यात गोल करणारे सर्वात युवा खेळाडू होते.

यानंतर पेले यांनी 1962 साली देखील वर्ल्डकप खेळला आणि या वर्ल्डकपमध्येही ब्राझीलने विजय मिळवला होता. त्यावेळी सलग दोन वर्ल्डकप जिंकणारा ब्राझील इटलीनंतरचा दुसराच संघ ठरला होता. पेले यांनी 8 वर्षांनी 1970 साली चौथा वर्ल्डकप खेळले. या वर्ल्डकमध्येही ब्राझीलने विजय मिळवला. त्यामुळे पेले यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 3 वर्ल्डकप जिंकले. असा पराक्रम करणारे ते पहिले फुटबॉलपटूही ठरले. त्यांनी त्यांच्या वर्ल्डकप कारकिर्दीत एकूण 12 गोल नोंदवले.

त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ब्राझीलसाठी खेळताना 77 गोल केले. ते सध्या ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत नेमारसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांनी 1977 साली निवृत्ती घेतली. पण त्यानंतरही ते ब्राझील फुटबॉलमध्ये सक्रिय होते. ते 1995 ते 1998 दरम्यान ब्राझीलचे क्रीडामंत्रीही होते.

पण पेले यांना कधीही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नव्हते. त्यांची पासिंग करण्याची शैलीही चांगली होती. त्यामुळे ते असिस्टही चांगले करायचे. याशिवाय त्यांचे ड्रिबलिंग कौशल्य कमालीचे होते.

दरम्यान, पेले यांची वैयक्तिक आयुष्यही बरेच चर्चेत राहिले. असे म्हटले जाते की त्यांनी त्यांच्या आयुष्यात 3 लग्न केली. तसेच त्यांना 7 मुलं होती. त्याचबरोबर त्यांचे अनेक अफेअर्स देखील होते. त्यातूनही त्यांना मुलं झाली होती. तसेच रिपोर्ट्सनुसार त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारीकडूनही त्यांना मुलगी झाली होती. ती मुलगी पेले यांचीच आहे, हे सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाई देखील लढावी लागलेली.

पेले यांनी संपूर्ण कारकिर्दीत 1363 सामन्यांत 1281 गोल केले असल्याचीही नोंद आहे. पेले यांनी ब्राझील व्यतिरिक्त सँतोस एफसी क्लबकडून सर्वाधिक सामने खेळले. तसेच त्यांनी न्यूयॉर्क कॉसमॉस, ब्राझीलमधील मिलिटरी संघ अशा काही संघाकडूनही सामने खेळले. पेले यांनी त्यांच्या कारकिर्दीत मिळवलेल्या यशामुळे त्यांना फुटबॉलचा देव अशी उपाधीही दिली जाते. आता या फुटबॉलच्या अनभिषिक्त सम्राटाने जगाचा निरोप घेतला असल्याने जगभारातून हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT