Team India  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: रोहित-विराटची गळाभेट अन् टीम इंडियाचा नेटमध्ये जोरदार सराव, कसोटीच्या तयारीचा पाहा Video

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे.

Pranali Kodre

India vs Australia: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी ही 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने जोरदार सरावाला सुरुवात केली आहे.

भारतीय संघ 3 फेब्रुवारीपासून नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सराव करत आहे. याच मैदानात 9 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय खेळाडू मैदानावर घाम गाळत आहे. तसेच भारतीय संघाचे सपोर्ट स्टाफ सदस्यही त्यांच्यावर मेहनत घेत आहेत. तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही खेळाडूंशी चर्चा करताना दिसत आहेत. तसेच सरावादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहली यांनी गळाभेटही घेतली.

तसेच भारतीय संघाच्या तयारीबद्दल राहुल द्रविडने म्हटले की कोचिंग स्टाफ गेल्या महिन्याभरापासून या सराव शिबिरासाठी तयारी करत होता. तसेच त्यांनी सांगितले की या सराव शिबिरात जवळच्या झेलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. कारण या कसोटी मालिकांमध्ये स्लीपचे झेल, तसचे जवळचे झेल महत्त्वाचे ठरणार आहेत.

तसेच द्रविडने असेही सांगितले की काही खेळाडू मर्यादीत षटकांच्या मालिका खेळून कसोटीत खेळण्यासाठी आले आहेत. त्यामुळे ते अतिरिक्त सरावही करत आहेत.

सूर्यकुमारला पदार्पणाची संधी

या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून सूर्यकुमार यादवला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. कारण पहिल्या सामन्यातून पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमारला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

जडेजा - रोहितचे पुनरागमन

या कसोटी मालिकेतून रविंद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. जडेजा त्याचा अखेरचा कसोटी सामना जुलै 2022 मध्ये आणि रोहितने मार्च 2022 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला आहे.

जडेजा गेले 5 महिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. तसेच रोहितही कोविडमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याला आणि नंतर अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांचा मुकला होता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी)

9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी, नागपूर

17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, दिल्ली

1 मार्च ते 5 मार्च - तिसरी कसोटी, धरमशाला

9 मार्च ते 13 मार्च - चौथी कसोटी - अहमदाबाद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT