Rohit Sharma | Suryakumar Yadav | Rahul Dravid | India vs Australia Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: सूर्यकुमार की गिल, पहिल्या कसोटीत कोणाला स्थान? कॅप्टन रोहितने स्पष्टच सांगितलं

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मार्च 2022 नंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडण्याबद्दल सांगितले 'हे कठीण असणार आहे. आम्हाला माहित आहे अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. संघासाठी हे चांगले संकेत आहेत. तुमच्यासमोर संघ निवडण्याची समस्या आहे आणि हीच समस्या सांगते की खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.'

'पण संघाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे हे आहे की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांवरील परिस्थिती, खेळपट्टी पाहू आणि त्यानुसार आमचा सर्वोत्तम 11 जणांचा संघ निवडू. आम्ही यापूर्वी असे करत होतो आणि यापुढेही असेच करू.'

दरम्यान, उपकर्णधार केएल राहुलची प्लेइंग इलेव्हनमधील जागा जवळपास पक्की असताना सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार की दोघांनाही पहिल्या कसोटीत संधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे.

याबद्दल रोहित म्हणाला, 'खेळाडूंना आम्ही स्पष्ट सांगितले आहे की ज्या परिस्थितीसाठी जो योग्य असेल, तसा विचार केला जाईल. आम्हाला ज्याची गरज असेल, त्याला संघात घेऊ, हे इतके साधे आहे. आम्ही परिस्थितीचे मुल्यांकन करू आणि ठरवू की कोणते खेळाडू योग्य आहेत. त्यामुळे आम्ही सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.'

तसेच रोहितने असेही म्हटले आहे की गिल आणि सूर्यकुमार दोघेही चांगले खेळाडू आहेत. तो म्हणाला, 'ते दोघेही वेगवेगळे पैलू संघात घेऊन येतात. गिल सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे, तसेच सूर्याने टी20मध्ये दाखवून दिले आहे की त्याच्यात किती क्षमता आहे आणि तो कसोटीतही कोणत्याप्रकारचा खेळ करू शकतो. दोन्हीही चांगले पर्याय आहेत. पण आम्ही या दोघांपैकी कोणाला खेळवायचे याबद्दल अद्याप विचार केलेला नाही.'

यष्टीरक्षण करणार कोण?

डिसेंबर 2022 अखेरीस झालेल्या अपघातातून अद्याप ऋषभ पंत सावरत आहे. त्यामुळे तो या मालिकेचा भाग नाही. त्याच्याजागेवर आता भारतासाठी कोण यष्टीरक्षण करणार हा प्रश्न आहे. भारताकडे ईशान किशन, केएल राहुल आणि केएस भरत हे पर्याय आहेत.

याबद्दल रोहित म्हणाला, 'तुम्हाला कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे. ऋषभने ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे, ते पाहाता तो आमच्यासाठी महत्त्वाचा होता. आमच्याकडे त्याची मधल्या फळीत जागा घेण्यासाठी पर्याय आहेत. तुम्हाला ऑर्थोडॉक्स क्रिकेटही खेळावे लागते. आमची फलंदाजी मजबूत आहे आणि सर्व फलंदाज धावा करण्याचा मार्ग शोधत आहेत आशा आहे की उद्या आम्ही मैदानात उतरू तेव्हा आमची ध्येय पूर्ण करू.'

चारही फिरकीपटू उपलब्ध

खेळपट्टीबद्दल बोलताना तो म्हणाला, सर्व खेळाडू चांगले आहेत आणि खेळपट्टीचा फार दबाव घेतलेला नाही. संघ केवळ सामना खेळण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. दरम्यान, पहिल्या सामन्यात फिरकीपटू महत्त्वपूर्ण असणार असल्याचे म्हटले जात आहे. भारताकडे कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा अशा चार फिरकीपटूंचे पर्याय आहेत.

रोहित फिरकी गोलंदाजीबद्दल म्हणाला, 'चारही चांगले फिरकीपटू आहेत. चौघेही उपलब्ध असल्याने आमच्यासाठी हे चांगले संकेत आहेत. या चौघांपैकी तिघे अष्टपैलू आहेत. तसेच कुलदीपनेही बांगलादेशविरुद्ध धावा केल्या आहेत. त्यामुळे ते आमच्या फलंदाजीला सखोलता देतात.'

याशिवाय रोहितने हे देखील मान्य केले की ऑस्ट्रेलियाकडेही चांगले फिरकीपटू असून त्यांचा सामना करणेही सोपे असणार नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ही कसोटी मालिका कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेचा भाग असून दोन्ही संघांना या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT