Commonwealth Games 2022 Twitter
क्रीडा

Commonwealth Games 2022:बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्सची शानदार सुरूवात, पीव्ही सिंधूने केले भारतीय संघाचे नेतृत्व

Commonwealth Games 2022 News: इंग्लंडमधील बर्मिंगहॅमध्ये 22 व्या राष्ट्रकुल खेळांना अधिकृतपणे सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये एका भव्य समारंभात कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या अधिकृत उद्घाटनाची घोषणा करण्यात आली. यादरम्यान अलेक्झांडर स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रिन्स चार्ल्स यांनी खेळाच्या उद्घाटनाची घोषणा केली. 22 व्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेचा (Commonwealth Games 2022) उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी अलेक्झांडर स्टेडियममध्ये 30,000 हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या उद्घाटन समारंभात परेडमध्ये सहभागी होणारा ऑस्ट्रेलिया पहिला होता. कॉमनवेल्थ गेम्सच्या परंपरेनुसार मागील खेळांचे यजमान होते. त्यानंतर ओशनिया प्रदेश, आफ्रिका, अमेरिका, आशिया, कॅरेबियन आणि शेवटी युरोपचे देश मैदानात उतरताना दिसले.

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना ग्रँड ओपनिंग कॉमनवेल्थ गेम्स सोहळ्यात ध्वजवाहक बनवण्यात आले. अलेक्झांडर स्टेडियमवर आयोजित 2022 च्या उद्घाटन समारंभात पी.व्ही. सिंधू आणि मनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पोहोचला.

दुसरीकडे, पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारूफ हिने कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या उद्घाटन समारंभात तिच्या देशाचे प्रतिनिधित्व केले. या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर बिस्माह मारूफने क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन केले आहे.

बर्मिंघममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत कॉमनवेल्थ गेम्स 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान 215 खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील, जे 19 खेळांमधील 141 स्पर्धांमध्ये भाग घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT