Players  Dainik Gomantak
क्रीडा

ICC ची मोठी घोषणा, 11 पेक्षा कमी खेळाडूंसह संघ उतरु शकणार मैदानात!

आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, जर एखाद्या संघात कोरोनाचा प्रसार झाला तर तो किमान 9 खेळाडूंसह मैदानात उतरु शकतो.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने अनेक नियम बदलले आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रसारामुळे खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवले जात आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यावर तो सॅनिटाइज केला जात आहे. जर एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली असेल तर, प्रत्येक खेळाडूची कोविड चाचणी अनिवार्य केली जाते. लक्षणे असलेल्या खेळाडूंना त्यानंतर क्वारंटाईन करण्यात येते. त्यातच आता आता ICC ने महिला विश्वचषक 2022 साठी आणखी एक मोठा नियम जाहीर केला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखाद्या संघात कोरोनाचा प्रसार झाला तर तो किमान 9 खेळाडूंसह मैदानात उतरु शकतो. (Big Announcement Ahead Of ICC Women's World 2022 With less Than 11 Players Entering The Field)

दरम्यान, आयसीसीचा हा नियम बीसीसीआयने (BCCI) प्रेरित केलेला दिसतो, ज्याने रणजी ट्रॉफीसाठी हाच नियम बनवला आहे. अलीकडेच अंडर-19 विश्वचषकादरम्यान टीम इंडियासह (Team India) अनेक संघांमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले होते. टीममध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भारताला प्लेइंग इलेव्हनला उतरवण्यातही अडचण आली होती. सपोर्ट स्टाफला मैदानात उतरावे लागेल, अशी परिस्थिती होती. ही परिस्थिती पाहून आता आयसीसीने 11 ऐवजी 9 खेळाडूंसह खेळ सुरु ठेवण्याचा नियम केला आहे.

तसेच, आयसीसी महिला विश्वचषक 2022 4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरु होत आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात बे ओव्हलमध्ये होणार आहे. भारतीय संघ ६ मार्चला पाकिस्तानविरुद्ध मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघ 10 मार्चला न्यूझीलंड, 12 मार्चला वेस्ट इंडिज आणि 16 मार्चला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यांना 19 मार्चला ऑस्ट्रेलिया, 22 मार्चला बांगलादेश आणि 27 मार्चला दक्षिण आफ्रिकेशी सामना करायचा आहे.

भारताचा विश्वचषक संघ- मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, पूज्य यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडूनं निवृत्ती मागे घेतली, T-20 आणि कसोटीतही खेळणार

'या दुःखद घटनेने मन हेलावले', हडफडे नाईटक्लब प्रकरणानंतर मालकाची पहिली प्रतिक्रिया; कोण आहे हा सौरभ लुथरा?

Goa Bus Stand: गुड न्यूज! गोव्यातील 'ही' बसस्थानके होणार चकाचक; जवळपास 400 कोटी खर्चून मिळणार अद्ययावत सुविधा

Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

SCROLL FOR NEXT