Bhupinder Singh Gill become first Sikh assistant referee at a Premier League Dainik Gomantak
क्रीडा

Premier League: अभिमानास्पद! भूपेंदर सिंग बनले प्रीमियर लीग इतिहासातील पहिले शीख असिस्टंट

गोमन्तक डिजिटल टीम

Bhupinder Singh Gill: प्रीमियर लीग 2022-23 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. आता या स्पर्धेत एक मोठा इतिहास रचला गेला आहे. 37 वर्षीय भूपेंदर सिंग सिंग हे प्रीमियर लीगमधील पहिले शीख-पंजाबी सामनाधिकारी बनले आहेत. त्यांनी 4 जानेवारी रोजी साउथँम्पटन विरुद्ध नॉटिंगघम सामन्यात असिस्टंट रेफ्री म्हणून काम पाहिले.

त्यांनी हा विक्रम नोंदवल्यानंतर त्यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ते यापूर्वी शारिरीक शिक्षणाचे शिक्षक होते. पण त्यांच्या कुटुंबातच फुटबॉल रेफ्री बनण्याचा वारसा आहे. त्यांचे वडील आणि भाऊ देखील फुटबॉल रेफ्री आहेत. भूपेंदर यांच्या वडिलांनी आणि भावाने इंग्लिश फुटबॉल लीगमध्ये रेफ्री म्हणून काम केले आहे.

(Bhupinder Singh Gill become first Sikh assistant referee at a Premier League)

त्यांचे वडील जरनैल यांनी 2004 ते 2010 दरम्यान 150 पेक्षाही अधिक सामन्यांमध्ये इंग्लिश फुटबॉल लीगमध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

तसेच भूपेंदर यांचा भाऊ सनी यांनीही इंग्लिश फुटबॉल लीगमध्ये सामनाधिकारी म्हणून काम केलंय. सनी जरनैल यांच्यानंतर इंग्लिश फुटबॉल लीगमध्ये रेफ्री म्हणून काम पाहाणारे पहिलेच ब्रिटीश दक्षिण आशियाई ठरले होते.

या विक्रमाबद्दल भूपेंदर यांनी म्हटले आहे की 'हा माझ्यासाठी रेफ्री म्हणून झालेल्या प्रवासातील अभिमानास्पद आणि उत्साहपूर्ण क्षण आहे. पण मी यामुळे भारावून जाणार नाही, कारण मला जिथे जायचे आहे, त्या दिशेने पडलेले हे फक्त एक पाऊल आहे. आशा आहे की पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी हा महत्त्वाचा क्षण असेल.'

भूपेंदर पुढे म्हणाले, 'माझे स्वप्न नेहमीच खेळात सर्वोत्तम ठिकाणी पोहचण्याचे, भविष्यातील सामन्याधिकाऱ्यांसाठी आदर्श बनण्याचे आणि विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांना विशेषत: माझ्यासारख्या दक्षिण आशियाई पार्श्वभूमी असलेल्या लोकांना प्रेरणा मिळावी, हेच राहिले आहे.'

विशेष म्हणजे भूपेंदर यांनी खूप आधीपासूनच रेफ्री बनण्याची तयारी सुरू केली होती. त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षीच रेफ्री बनण्याची परिक्षा उत्तीर्ण केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT