Best wishes to Team India for the Asian Games through a special 'Vande Mataram' initiative by Adhani Sportsline. Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games साठी टीम इंडियाला खास 'वंदे मातरम्'द्वारे शुभेच्छा, आदानी स्पोर्ट्सलाइनचा उपक्रम

19 वी एशियन गेम्स हांगझोऊशिवाय इतर पाच शहरांमध्ये आयोजित केला जात आहे. हुझोउ, निंगबो, शाओक्सिंग, जिन्हुआ आणि वेन्झोउ ही शहरे आहेत.

Ashutosh Masgaunde

Best wishes to Team India for the Asian Games through a special 'Vande Mataram' initiative by Adhani Sportsline:

नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्याने 2023 च्या एशियन गेम्सला सुरुवात झाली. सुमारे ९० मिनिटांच्या या कार्यक्रमात चीनची ऐतिहासिक संस्कृती आणि आधुनिकता यांचे मिश्रण पाहायला मिळाले.

उद्घाटन समारंभात भारताच्या वतीने लव्हलिना बोरगोहेन आणि हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी फ्लॅग मार्च केला. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतातून एकूण 655 खेळाडू सहभागी होत आहेत.

दरम्यान शिलाँग चेंबर कॉयर द्वारे एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी 'वंदे मातरम्' गीत सादर केले आहे.

"आगामी 19 व्या एशियन गेम्ससाठी टीम इंडियाला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी आमच्यात सहभागी व्हा. यामुळे आपल्या प्रिय देशाला गौरव मिळवून देणारा खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावेल." असे अदानी स्पोर्ट्सलाइन युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे.

हे गीत केदार उपाध्याय आणि भार्गव पुरोहित यांनी लिहले असून, याला संगीतही याच दोघांनी दिले आहे.

19 वी एशियन गेम्स हांगझोऊशिवाय इतर पाच शहरांमध्ये आयोजित केला जात आहे. हुझोउ, निंगबो, शाओक्सिंग, जिन्हुआ आणि वेन्झोउ ही शहरे आहेत.

या कालावधीत आशियातील 45 देश 40 क्रीडा प्रकार आणि 61 स्पर्धांमध्ये 481 सुवर्णपदकांसाठी स्पर्धा होणार आहे. यंदा पहिल्यांदाच ई-स्पोर्ट्सचाही पदकांच्या खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

शनिवारच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, सेलिंग, रोइंग, टेबल टेनिस आणि आधुनिक पेंटॅथलॉन या स्पर्धा सुरू झाल्या होत्या.

भारताला 5 पदके

आज म्हणजेच 24 सप्टेंबर हांगझोऊ, चीन येथे सुरू असलेल्या 19व्या एशियन गेम्समध्ये भारताला 5 पदके मिळाली आहेत. भारताने आज 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT