Ben Stokes

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Ashes 2022: इंग्लंड संघाला मोठा झटका, 'या' खेळाडूने मालिकेतून घेतली माघार

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या ऍशेस मालिकेत इंग्लंड आधीच 0-3 ने पिछाडीवर असून मालिकेतील चौथा सामना सिडनीमध्ये सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या ऍशेस मालिकेत इंग्लंड आधीच 0-3 ने पिछाडीवर असून मालिकेतील चौथा सामना सिडनीमध्ये सुरु आहे. एससीजीमध्ये सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यातही इंग्लिश संघाची अवस्था वाईटच आहे. ऑस्ट्रेलियाने (Australia) चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. तर इंग्लंडच्या (England) संघाला अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) रुपाने झटका बसला आहे.

दरम्यान, बेन स्टोक्सला दुखापत झाली असून तो दुसऱ्या दिवशी मैदानाबाहेर आहे. गोलंदाजी करत असताना बेन स्टोक्सच्या पाठीत दुखू लागले. यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले आणि त्याचे ओव्हर मार्क वुडने पूर्ण केले. सुमार कामगिरीमुळे अडचणीत सापडलेल्या इंग्लंड संघाला या सामन्यात गोलंदाजीचीही अडचण झाली. कर्णधार जो रुटने सात गोलंदाजांसह गोलंदाजी केली असून संघाला केवळ 8 विकेट मिळाल्या आहेत.

शिवाय, सिडनीतील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पावसाने खेळ खराब केला. पहिल्या दिवशी फक्त 46.5 षटके खेळली गेली, तर दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात फारच कमी षटके टाकली गेली. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात उस्मान ख्वाजाने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याने 260 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 137 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 67 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक 5 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Mumabi Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Avatar 3 Trailer Launch: नव्या विलेनची एन्ट्री... 2100 कोटींच्या 'अवतार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

Goa Third District: 'तिसरा जिल्हा' झाल्याने लोकांची सोय होईल, कामे जलद होतील, ही न पटणारी गोष्ट..

SCROLL FOR NEXT