Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

Ben Stoke Return: इंग्लंड संघाची घोषणा, वनडे वर्ल्ड कपध्ये स्टोक्स नावाचं वादळ पुन्हा घोंघावणार!

Ben Stoke: भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Manish Jadhav

Ben Stoke: भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या बेन स्टोक्सचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.

स्टोक्स केवळ एकदिवसीय विश्वचषकासाठी निवृत्तीनंतर परतला आहे. स्टोक्सने गेल्या वर्षी एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते, त्यावेळी स्टोक्सने म्हटले होते की, "मी वनडेतून निवृत्ती घेईन आणि परत येणार नाही"

गेल्या वर्षी वनडेतून निवृत्ती घेतली

दरम्यान, बेन स्टोक्सने इंग्लंडला 2019 चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2022 चा टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, बेन स्टोक्स विश्वचषकासाठी पुनरागमन करु शकतो, मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

16 ऑगस्ट रोजी जेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) वनडे संघाची घोषणा केली, तेव्हा त्यात बेन स्टोक्सचे नावही समाविष्ट होते.

बेन स्टोक्स 'चॅम्पियन'

बेन स्टोक्स हा चॅम्पियन खेळाडू आहे. 2019 च्या विश्वचषकात त्याने बॅट आणि बॉलने चमत्कार केला होता.

इतिहासात प्रथमच त्याने संघाला एकदिवसीय फॉर्मेटमध्ये जेतेपद मिळवून दिले होते. 2019 च्या विश्वचषकात स्टोक्सने 11 सामने खेळले, ज्यामध्ये 465 धावा केल्या आणि 7 विकेट घेतल्या. त्याने विजेतेपदाच्या सामन्यात 84 धावांची तूफानी खेळी खेळली होती. 2022 च्या T20 विश्वचषकात पाकिस्तान इंग्लंडसमोर होता.

पाकिस्तानने (Pakistan) 137 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंड अडचणीत असताना बेन स्टोक्स शेवटपर्यंत टिकून राहिला होता. त्याने 49 चेंडूत 52 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळून इंग्लंडला चॅम्पियन बनवले होते.

बेन स्टोक्स मधल्या फळीत खेळेल

बेन स्टोक्सने तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो इंग्लंडसाठी मधल्या फळीत फलंदाजी करु शकतो. तो भारतातही बॅटने चमत्कार करु शकतो.

बेन स्टोक्सची क्रिकेट कारकीर्द

97 कसोटीत 6117 धावा केल्या आणि 197 बळी घेतले

105 एकदिवसीय सामन्यात 2924 धावा आणि 74 विकेट

43 टी-20 सामन्यात 585 धावा आणि 26 विकेट्स

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ

बटलर (क), स्टोक्स, मोईन, ऍटकिन्सन, बेअरस्टो, सॅम करन, लिव्हिंगस्टोन, मालन, रशीद, रुट, रॉय, टॉपले, विली, वुड, वोक्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT