Ben Stokes  Dainik Gomantak
क्रीडा

बेन स्टोक्सची IPL 2024 मधून माघार; माहीच्या टीमला मोठा झटका!

IPL 2024 च्या आधी चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच CSK शी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

IPL 2024 च्या आधी चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच CSK शी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आयपीएलच्या पुढील मोसमात सीएसकेकडून खेळणार नाही.

CSK त्याला सोडण्याचा विचार करत होता, पण त्याने स्वतः ला IPL 2024 साठी अनुपलब्ध घोषित केले आहे. खुद्द सीएसकेने ही माहिती दिली आहे. वर्कलोड मॅनेजमेंट आणि फिटनेसमुळे स्टोक्स पुढील सीझनसाठी उपलब्ध नाही, असे सीएसकेने एका मीडिया रिलीझमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, 16.25 कोटींमध्ये विकत घेतलेल्या स्टोक्सच्या संदर्भात CSK ने आता मीडिया रिलीजमध्ये म्हटले की, "इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्सने त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंट आणि फिटनेसमुळे स्वतःला आयपीएल 2024 पासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे.''

32 वर्षीय स्टोक्स आयपीएल 2023 च्या आधीपासून सुपर किंग्सचा भाग राहिला आहे. त्याने अलीकडेच एकदिवसीय विश्वचषक (World Cup) 2023 मध्ये भाग घेतला, ज्यासाठी तो निवृत्तीचा निर्णय बदलून परत आला होता. सीएसकेने मागील मोसमात विजय मिळवला होता, पण स्टोक्स फारसा खेळला नाही.

दरम्यान, IPL 2023 मध्ये बेन स्टोक्स चेन्नई सुपर किंग्ससाठी फक्त 2 सामने खेळला. या दोन सामन्यांत त्याला केवळ 15 धावा करता आल्या. एका सामन्यात 8 तर दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून 7 धावा आल्या होत्या.

एका सामन्यात त्याला एक षटक टाकण्याची संधीही मिळाली होती, ज्यामध्ये त्याने 18 धावा दिल्या होत्या. त्यानंतर तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे अनेक सामन्यांमध्ये उपलब्ध नव्हता आणि नंतर कर्णधार एमएस धोनीने त्याला संधी दिली नाही. अखेरीस त्याने संघाला रामराम ठोकला कारण त्याला ऍशेस मालिका खेळायची होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

Khandola: कातळावर फुलवले नंदनवन! गोव्यातील ज्येष्ठ शेतकऱ्याने घडवला चमत्कार

Drum Circle Goa: गोव्याचा निळाशार समुद्र, लाटांची गाज; किनाऱ्यावर रंगणारी तालवाद्यांची मैफिल ‘ड्रम सर्कल’

SCROLL FOR NEXT