BCCI Will Review Team India
BCCI Will Review Team India Dainik Gomantak
क्रीडा

BCCI Will Review Team India: रोहित, विराट, द्रविड यांना बीसीसीआय घेणार फैलावर

गोमन्तक डिजिटल टीम

BCCI Will Review Team India: टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) भारतीय संघावर नाराज आहे. त्यामुळे लवकरच बीसीसीआयने या पराभवाची कारणमीमांसा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बैठक होणार असून या बैठकीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड़, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्याकडून बीसीसीआय स्पष्टीकरण घेणार आहे.

बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बैठकीत सेमीफायलनमधील पराभवावर चर्चा होईल. संघात बदलाची गरज दिसून येत आहे. कुठलाही निर्णय घेण्यापुर्वी या आढावा बैठकीत संघाचे म्हणणे जाणून घेतले जाईल. त्यामुळेच रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांना पाचारण केले गेले आहे. त्यांची मते जाणून घेऊनच भविष्यातील टी-20 चा संघ ठरवला जाणार आहे.

निवड समितीच्या अध्यक्षपदावरून शर्मांना हटविणार?

निवड समितीच्या कामगिरीनेही बीसीसीआय नाखुष आहे. माजी गोलंदाज चेतन शर्मा हे निवड समितीचे अध्यक्ष आहेत. निवड समितीच्या कामगिरीचेही मुल्यमापन या बैठकीत होईल. तथापि, चेतन शर्मांना या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे की नाही हे कळलेले नाही.

पुढील टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला जाणार आहे. तोपर्यंत वरीष्ठ खेळाडू टी-20 फॉरमॅट सोडतील. त्यामुळे पुढील वर्षात टी-20 संघात अनेक बदल दिसू शकतात. रोहित, विराट, कार्तिक, अश्विन हे खेळाडू टी-20 तून हळूहळू बाहेर पडू शकतात. आम्ही पुर्ण संघाचा विचार करत आहोत, संघाची वाईट कामगिरी रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT