Rahul Dravid | Jay Shah Dainik Gomantak
क्रीडा

Jay Shah - Rahul Dravid: भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठा धमाका? जय शाह - राहुल द्रविडमध्ये झाली सिक्रेट मीटिंग

Jay Shah - Rahul Dravid : राहुल द्रविड आणि जय शाह यांच्यात सिक्रेट मीटिंग झाल्याची माहिती मिळत आहे.

Pranali Kodre

BCCI secretary Jay Shah Secret meeting with Coach Rahul Dravid:

भारतीय संघाला आगामी काळात आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळायची आहे. भारताला गेल्या 10 वर्षापासून आयसीसी स्पर्धेतील विजेतेपदाची प्रतिक्षा आहे. दरम्यान आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे. पण अद्याप यासाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही.

यादरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे की भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यात जवळपास 2 तास चर्चा झाली आहे. जय शाह गेल्या आठवड्यात अमेरिकेला गेले होते. त्याचवेळी भारतीय संघही वेस्ट इंडिज दौऱ्यावर होती.

रिपोर्ट्सनुसार याचदरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील फ्लोरिडाला झालेल्या अखेरच्या दोन टी20 सामन्यापूर्वी जय शाह आणि द्रविड यांच्यात 2 तास गुप्त बैठक झाली.

क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार अखेरच्या दोन टी20 सामन्यासाठी भारतीय संघ मियामीमधील मॅरिएट हॉटेलमध्ये थांबली होती. पण त्यावेळी जय शाह दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलेले. त्यांनी बोलावल्यानंतर द्रविड त्यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यांच्यात चर्चा झाली.

मात्र, त्यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल माहिती मिळाली नाही. पण अंदाज असा वर्तवला जात आहे की आगामी आशिया चषक आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धेसंबंधितच त्यांच्यात चर्चा झाली असावी.

तसेच गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघाच्या कामगिरीवर, संघ व्यवस्थापनावर टीका होत आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा परिस्थितीत द्रविड आणि जय शाह यांच्यात झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पण आता या बैठकीचे परिणाम काय असणार आहेत, याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

आशिया चषकासाठी संघ घोषणेची प्रतिक्षा

दरम्यान आशिया चषक सुरू होण्यासाठी आता 15 दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला असल्याने भारतीय संघाची घोषणा कधी होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मीडियातील अनेक रिपोर्ट्सनुसार 20 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.

दरम्यान, आशिया चषकात खेळणारा संघच वर्ल्डकप 2023 साठीही कायम राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT