Jai Shah & Sourav Ganguly 
क्रीडा

गांगुलीच्या ट्विटने उडाली खळबळ, जय शाह म्हणाले, 'BCCI चे प्रमुख पद सोडले नाही'

बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी गांगुलीने आपल्या पदाचा राजीनामा दिला नसल्याची पुष्टी केली आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी असे ट्विट केले होते, त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा होती. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गांगुलीने आपल्या पदाचा राजीनामा दिला नसल्याची पुष्टी केली आहे. (BCCI secretary Jai Shah has confirmed that Ganguly has not resigned)

ANI नुसार, जय शाह म्हणाले, 'सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही.' गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ या वर्षी सप्टेंबरमध्ये संपणार आहे. गांगुलीने सोशल मीडियावर लिहिले की, '2022 मध्ये, माझा क्रिकेटचा प्रवास 30 वर्षांचा होईल, जो मी 1992 मध्ये सुरु केला होता. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे.

गांगुलीने अमित शहा यांची भेट घेतली

गृहमंत्री अमित शाह यांनी 6 मे रोजी गांगुली यांची भेट घेतली होती. शाह गांगुलीच्या कोलकाता येथील निवासस्थानी डिनरसाठी पोहोचले होते. या दोघांच्या भेटीनंतर गांगुली भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या वर्षीही याबाबत चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर गांगुली यांनी भाजपमध्ये येण्यास नकार दिला होता.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकीर्द

सौरव गांगुलीने 1992 मध्ये ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर 1996 मध्ये लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. गांगुलीचा शेवटचा कसोटी सामना 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात झाला होता. 2007 मध्ये ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. गांगुलीने 113 कसोटीत 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या. त्याचबरोबर 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11363 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 41.02 होती. गांगुलीने कसोटीत 16 आणि एकदिवसीय सामन्यात 22 शतके झळकावली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT