BCCI Production Team Wear Black Armbands X/BCCI
क्रीडा

IND vs ENG, Video: रांची कसोटीदरम्यान BCCI प्रोडक्शन टीमने दंडाला का बांधली काळी फित? 'हे' आहे कारण

BCCI production Team wears black armbands: भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथ्या कसोटीदरम्यान शनिवारी बीसीसीआयच्या प्रोडक्शन टीमने काळी फित बांधली होती. याबद्दल बीसीसीआयनेच माहिती दिली आहे.

Pranali Kodre

BCCI production Team members wears black armbands in memory of Kamalanadimuthu Thiruvalluvan:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू असून चौथा सामना रांचीमध्ये सुरू आहे. शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) सुरू झालेल्या या सामन्यादरम्यान शनिवारी (24 फेब्रुवारी) बीसीसीआयच्या प्रोडक्शन टीमने दंडाला काळी फित बांधली होती.

बीसीसीआयच्या प्रोडक्शन टीमने कॅमेरामन कमलानादिमुथू तिरुवल्लुवन यांच्या स्मरणार्थ दंडाला काळी फित बांधली होती. कॅमेरामन कमलानादिमुथू तिरुवल्लुवन यांचे शु्क्रवारी निधन झाले. त्यांना सर्वजण प्रेमाने थिरू म्हणायचे.

याबद्दल बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच बीसीसीआयच्या प्रोडक्शन टीमने दंडाला काळी फित बांधलेली दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने लिहिले आहे की 'बीसीसीआयच्या प्रोडक्शन टीमने थिरू यांच्या स्मरणार्थ दंडाला काळी फित बांधली आहे, थिरू यांचे काल (शुक्रवारी) निधन झाले. आमच्या संवेदना त्यांच्या जवळच्या आणि प्रेमाच्या माणसांबरोबर आहेत. बीसीसीआय त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत आहे.'

विशेष म्हणजे थिरू यांनी शुक्रवारी वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि नंतर झालेला मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामनाही कव्हर केला होता. परंतु, त्यानंतर त्यांचे कशामुळे निधन झाले. याबद्दल बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.

थिरु यांनी बीसीसीआयच्या प्रोडक्शन टीमबरोबर गेली अनेकवर्षे काम केले आहे. त्यांनी अनेक भारतीय क्रिकेटपटूंना हिरो होताना जवळून पाहिले देखील आहे. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT