India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

भारत-पाकिस्तान संघात क्रिकेट मालिका होणार? BCCI अध्यक्ष म्हणाले...

India vs Pakistan: जवळपास गेल्या 10 वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान संघात द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही.

Pranali Kodre

BCCI president Roger Binny hopeful for India vs Pakistan bilateral series:

भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यांची उत्सुकता नेहमीच चाहत्यांमध्ये असते. पण जवळपास गेल्या 10 वर्षांपासून या दोन संघात द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. राजकिय तणावामुळे हे दोन संघ केवळ आयसीसी किंवा आशियाई स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान संघात येत्या काळात द्विपक्षीय मालिका होईल अशी आशा बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी व्यक्त केली आहे. पण या दोन संघात सामना होण्यासाठी सरकारचीही परवानगी महत्त्वाची असते.

रॉजर बिन्नी आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचा नुकताच पाकिस्तान दौरा झाला आहे. त्यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आमंत्रित करण्यात आले होते. हे आमंत्रण स्विकारल्यानंतर बिन्नी आणि शुक्ला आशिया चषकातील सामने पाहाण्यासाठी गेले होते. दरम्यान, तब्बल 17 वर्षांनंतर बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तानला गेले होते.

पाकिस्तान आशिया चषक 2023 स्पर्धेचे यजमान आहेत. पाकिस्तानमध्ये या स्पर्धेतील चार सामने खेळवण्यात आले होते.

दरम्यान, पाकिस्तानवरून परत आल्यानंतर बिन्नी पीटीआयशी द्विपक्षीय मालिकांबद्दल बोलताना म्हणाले, 'बीसीसीआय काही बोलू शकत नाही. ही सरकारची समस्या आहे. त्यांना याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. आम्हावा प्रतिक्षा करावी लागेल. आशा आहे की हे होईल, कारण वनडे वर्ल्डकप येत आहे. पाकिस्तान संघ भारतात खेळायला येणार आहे.'

'अगदी यापूर्वीही क्रिकेट हे दोन्ही देशातील महत्त्वाचे माध्यम होते. उदाहरण म्हणून २००४ चा दौरा घ्या. त्यावेळी जे वातावरण तयार झाले होते, त्याचा परिणाम मैत्री आणि व्यापारात दिसला. त्यावेळी दुकानदार लोकांकडून पैसेही घेत नव्हते, तेव्हा वातावरण चांगले होते.'

तसेच पाकिस्तानमधील वास्तव्याबद्दल बिन्नी म्हणाले, 'आमची पाकिस्तानमध्ये चांगली बैठक झाली. आमचे खूप चांगले आदरातिथ्य झाले. त्यांनी आमची चांगली काळजी घेतली. महत्त्वाचा अजेंडा असा होता की क्रिकेटचे सामने पाहाणे आणि त्यांच्याबरोबर बसून काही गोष्टींबद्दल चर्चा करणे. एकूणच ही चांगली ट्रीप होती.'

राजीव शुक्ला यांनीही पाकिस्तानच्या आदरातिथ्याचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Glowing Trees Goa: अद्भुत! गर्द काळोखात, गोव्याच्या घनदाट जंगलात 'चमकणारी झाडे'

Congress: काँग्रेसच्या यशात 'संविधान वाचवा'चा वाटा, पण डॉ. आंबेडकरांशी असलेले तणावपूर्ण संबंध विसरता येईल का?

Tesla Showroom In Mumbai: इलॉन मस्कच्या 'टेस्ला' कंपनीचं मुंबईत जय महाराष्ट्र! वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातलं पहिलं शो रूम सुरू

Comunidade Land: कोमुनिदाद जमिनी लाटू नका! अन्यथा गावकारी संपेल, भूमिपुत्र संपतील, पर्यायाने गोंयकारांसह गोवाही संपेल...

School Bag: दप्तराच्या ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी 'प्रसन्न' नसेल तर त्याला अभ्यास कसा पेलवेल?

SCROLL FOR NEXT