19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या IPL स्पर्धेसाठी BCCI ने एक नवी नियमावली (New rules) जाहिर केली आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

Covid-19 च्या पार्श्वभुमीवर BCCI ने केले IPL च्या नियमात मोठे बदल

या दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेसाठी आम्ही प्रेक्षकांना देखील बोलविण्याचा विचार करत आहोत. पण प्रेक्षक आले तर नियम आणखीनच कडक रित्या पाळावे लागणार आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई: कोरोनामुळे (COVID 19) आता आयपीएलच्या (IPL) नियमांमध्ये देखील बदल (Also changes in rules)करण्याता आला आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत BCCI ने एक नवी नियमावली (New rules) जाहिर केली आहे. खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता BCCI ने कोरोनाच्या धोक्याला समोर ठेऊन नियम तयार केले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे, फलंदाजाने षटकार किंवा चौकार खेचत चेंडू स्टँडमध्ये घालविल्यास तो बदलण्यात येईल. तर बाहेर मारलेला चेंडूला संपूर्ण सॅनिटाईज (Sanitize) करण्यात येईल.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जर चेंडू स्टँमध्ये किंवा त्याच्याबाहेर गेल्यास चौथा पंच त्याच्याकडे असणारा नवीन चेंडू देईल, तसेच बाहेर स्टँडमध्ये मारलेला चेंडू परत आणून तो सॅनिटाईझ करुन मग पुन्हा वापरण्यात येईल. चेंडूवर रिसर्च केल्यानंतर त्याव्दारे कोरोना संक्रमण होण्याचा धोका फरच कमी आहे. तरी देखील आम्हाला कोणतीही जोखीम घ्यावयाची नाही. सॅनिटायजेशनचा पर्यय आम्ही आधी वापरत होतोच. या दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेसाठी आम्ही प्रेक्षकांना देखील बोलविण्याचा विचार करत आहोत. पण प्रेक्षक आले तर नियम आणखीनच कडक रित्या पाळावे लागणार आहेत.

खेळाडूंना 6 दिवसांचे विलगीकरण

आपीएलसाठी युएईत येणाऱ्या खेळाडूंना 6 दिवसांचे विलगीकरण असेल. तसेच बायोबबलमध्ये तीन कोरोना चाचण्या घेण्यात येतील.

या शिवाय कोणत्याही खेळाडूंनी खेळाच्या मैदानावर त्यांच्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, टॉवेल एकमेकांसोबत शेअर करता येणार नाहीत.

ब्रेक दरम्यान ड्रिंक घेऊन जाणाऱ्या खेळाडूंनी ड्रिंक्स बॉक्स मैदानावर ठेवणे आवश्यक आहे आणि सर्व खेळाडू फक्त त्यांच्या पूर्व-सेट बाटल्या वापरू शकतात जेणेकरून शेअरिंग टाळता येईल.

बीसीसीआयने फ्रँचायझींना खेळाडूंच्या नावाच्या बाटल्या पुरवण्यास सांगण्यात आले आहे.

बीसीसीआयने संघांना खेळाडूंना टॉवेल, कोणत्याही प्रकारचे कपडे एकमेकांसोबत वापरू नयेत असे निर्देश देण्यास सांगितले आहे.

याव्यतिरिक्त, खेळाडूंना त्यांच्या मुक्कामासाठी हॉटेल परिसरासत गोल्फ कोर्स वापरण्याची परवानगी दिली जाईल.

गोल्फ क्लबमध्ये बार, रेस्टॉरंट्स, कॅफे, व्यायामशाळा, लॉकर रूम वापरण्याची परवानगी नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT