Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

Team India: बुमराह, पंतसह 5 खेळाडूंचे BCCI ने दिले मेडिकल अपडेट्स, जाणून घ्या कोणाची काय स्थिती

BCCI Medical Updates: बीसीसीआयने शुक्रवारी जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांच्यासह 5 खेळाडूंचे मेडिकल अपडेट्स दिले आहेत.

Pranali Kodre

BCCI issued medical and fitness updates on 5 Indian Cricketers: भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू सध्या दुखापतीतून सावरत आहेत. हे खेळाडू बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनमध्ये (NCA) त्यांच्या दुखापतीवर काम करत आहेत. या खेळाडूंपैकी 5 खेळाडूंबाबत बीसीसीआयने महत्त्वाचे वैद्यकिय अपडेट्स दिले आहेत.

बीसीसीआयने जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या पाच खेळाडूंबाबत अपडेट्स दिले आहेत.

बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा लवकरच करणार पुनरागमन

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार 'जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा या वेगवान गोलंदाजांची रिहॅब प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आहे. दोघेही पूर्ण ताकदीने नेट्समध्ये गोलंदाजी करत आहेत.'

'आता काही दिवसात एनसीए सराव सामने आयोजित करेल, ज्यात हे दोघेही खेळतील. बीसीसीआय त्यांच्या सुधारणेबाबत खूश आहे. दोघांच्याबाबतीत अंतिम निर्णय सराव सामन्यांनंतर घेतला जाईल.'

दरम्यान, जर बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी सराव सामन्यातही प्रगती दाखवली, तर आगामी एशिया कप किंवा त्याआधी होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यातून पुनरागमन करू शकतात.

श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने सुरु केला सराव

तसेच बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि केएल राहुलबद्दलही माहिती दिली आहे की 'दोघांनी नेट्समध्ये फलंदाजी सरावाला सुरुवात केली आहे. सध्या दोघेही स्ट्रेंथ आणि फिटनेसचे सराव करत आहेत. बीसीसीआयचे वैद्यकिय पथक त्यांच्यातील सुधारणेने समाधानी आहे. ते लवकरच त्यांच्या क्षमता आणि कौशल्यासाठी आणखी जोराने तयारी करतील.'

ऋषभ पंतमध्येही सुधारणा

याशिवाय गेल्यावर्षाअखेरीस झालेल्या कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतही त्याच्या दुखापतीतून सावरत असून त्याच्या तंदुरुस्तीबद्दलही बीसीसीआयने अपडेट्स दिल्या आहेत.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार 'पंतने त्याच्या रिहॅब प्रक्रियेत चांगली प्रगती केली आहे. त्याने नेट्समध्ये फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव करण्यास सुरुवात केली आहे. आता तो त्याच्यासाठी तयार करण्यात आलेल्या धावणे, ताकद आणि लवचिकता याबाबतच्या योजनांचे पालन करत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT