Team India  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी

Manish Jadhav

BCCI Release Team India Squad: इंग्लंडविरुद्ध 25 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात यष्टिरक्षक ध्रुव जुरैलला स्थान मिळाले आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यांसाठी तीन यष्टीरक्षक फलंदाजांचा संघात समावेश केला आहे.

दरम्यान, ईशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर पहिल्या दोन सामन्यांतही त्याला संघात स्थान मिळालेले नाही. संघात स्थान मिळवण्यासाठी ईशानला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असे प्रशिक्षक राहुल द्रविडने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी सांगितले होते.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), एस गिल, वाय जयस्वाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरैल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

25-29 जानेवारी – पहिली कसोटी, हैदराबाद

2-6 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, विशाखापट्टणम

15-19 फेब्रुवारी- तिसरी कसोटी, राजकोट

23-27 फेब्रुवारी – चौथी कसोटी, रांची

7-11 मार्च – पाचवी कसोटी, धर्मशाला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

SCROLL FOR NEXT