Team India Dainik Gomantak
क्रीडा

India's Tour of West Indies: BCCI ने केली वेस्ट इंडिज दौऱ्याची घोषणा! पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

बीसीसीआयने भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची घोषणा केली असून कधी आणि कुठे सामने होणार, जाणून घ्या.

Pranali Kodre

India's tour of the West Indies schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी (12 जून) भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक घोषित केले आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी20 आशा तिन्ही प्रकारातील मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होईल.

बीसीसीआयने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.

दरम्यान 12 ते 24 जुलै दरम्यान होणारी कसोटी मालिका ही कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वातील (2023-25) भारताची पहिलीच मालिका असेल. या मालिकेतील पहिला सामना विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियमवर होईल.

त्यानंतर 20 ते 24 जुलै दरम्यान, दुसरा कसोटी सामना क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर होईल. हे दोन्ही कसोटी सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील.

त्यानंतर 27 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि भारत संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहेत. या मालिकेतील तीन सामने अनुक्रमे 27, 29 आणि 1 जुलै रोजी पार पडणार आहे. वनडे मालिकेतील सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

त्यानंतर 3 ते 13 ऑगस्टदरम्यान वेस्ट इंडिज आणि भारत संघांमध्ये 5 टी20 सामन्यांची मालिका होईल. या मालिकेतील सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता सुरु होतील. दरम्यान, अद्याप या मालिकांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आलेली नाही.

असे आहे भारतीय संघाचे वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

  • कसोटी मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- संध्या. 7.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    12 - 16 जुलै - पहिला कसोटी सामना, विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, डॉमिनिका

    20 - 24 जुलै - दुसरा कसोटी सामना, क्विंन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद

  • वनडे मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत)- वेळ- संध्या. 7.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    27 जुलै - पहिला वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    29 जुलै - दुसरा वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    1 ऑगस्ट - तिसरा वनडे सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

  • टी20 मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    3 ऑगस्ट - पहिला टी२० सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

    6 ऑगस्ट - दुसरा टी२० सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    8 ऑगस्ट - तिसरा टी२० सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    12 ऑगस्ट - चौथा टी२० सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

    13 ऑगस्ट - पाचवा टी२० सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT