Shakib Al Hasan ICC
क्रीडा

Shakib Al Hasan: टाईम आउटच्या ड्रामानंतर आता बांगलादेशचा कर्णधार वर्ल्डकपमधून बाहेर!

World Cup 2023: शाकिब अल हसन वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे.

Pranali Kodre

Bangladesh Captain Shakib Al Hasan ruled out of ICC ODI Cricket World Cup 2023 due to Index finger Injury:

सोमवारी (6 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सने विजय मिळवला. पण, या सामन्यानंतर बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन उर्वरित वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. शाकिबला श्रीलंकाविरुद्ध खेळताना डाव्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली आहे.

त्याला श्रीलंकेने दिलेल्या 280 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजीवेळी दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याचा एक्स-रे काढण्यात आला असून त्यात त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पण्ण झाले आहे.

याच कारणामुळे तो 11 नोव्हेंबर रोजी पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध राहू शकणार नाही.

अफगाणिस्तानचे फिजिओ बायजेदुल इस्लाम खान यांनी याबद्दल माहिती दिली आहे की 'शाकिबला त्याच्या खेळीच्या सुरुवातीला डाव्या तर्जनीला दुखापत झाली. पण त्याने मलमपट्टी करत आणि पेनकिलर्स खाऊन फलंदाजी करणे सुरू ठेवले.'

'त्यानंतर त्याचे दिल्लीमध्ये तात्काळ एक्स-रे करण्यात आला, ज्यात त्याला फ्रॅक्चर झाल्याचे समजले आहे. तो पुढील तीन ते चार आठवड्यात बरा होईल. तो आज (7 नोव्हेंबर) बांगलादेशला रवाना होईल.'

दरम्यान, शाकिबने बांगलादेशविरुद्ध फंलदाजी करताना 65 चेंडूत 82 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यामुळे बांगलादेशला या सामन्यात विजय मिळवण्यात यश मिळाले. शाकिबने फलंदाजीपूर्वी गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही मिळाला.

सामन्यादरम्यान शाकिब टीकेचा धनी

हा सामना बांगलादेशने जिंकला असला, तरी हा सामना अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट देण्याच्या कारणाने प्रचंड चर्चेत राहिला. शाकिबने मॅथ्यूजविरुद्ध टाईम आऊटचे अपील केले होते, जे अपील त्याने मागे घेतले नाही.

त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली. अनेकांच्या मते मॅथ्यूजला हेल्मेटची समस्या झाल्याने उशीर होत होता, अशात शाकिबने खिलाडूवृत्ती दाखवून अपील मागे घ्यायला हवे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची जागतिक पातळीवर छाप; ठरले आशिया पॅसिफिकमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व

Goa Kidnapping Case: बेपत्ता शाळकरी मुलांची महाराष्ट्रातून सुटका, उत्तर प्रदेशातील एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई

Goa Land Conversions: गोमंतकीयांशी चाललेली प्रतारणा थांबवा, थोडी तरी जमीन गोवेकरांसाठी ठेवा..

IND vs ENG 3rd Test: गिलसाठी 'लॉर्ड्स टेस्ट' बनणार अग्निपरीक्षा, क्रिकेटच्या पंढरीत कसा आहे भारताचा रेकॉर्ड? आकडे भरवतात धडकी

Murder Case Goa: गुप्तांग कापले, डोके ठेचले! पर्रा येथे कामगाराचा कोल्ड बल्डेड खून; बाप लेकाला अटक

SCROLL FOR NEXT