Bangalore beat FC Goa in the Development League Football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवावर बंगळूर संघाचा विजय

भरपाई वेळेतील गोलमुळे जमशेदपूरने चेन्नईयीनला रोखले

Kishor Petkar

पणजी : सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना गोल स्वीकारल्यामुळे रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवास बंगळूर एफसीसमोर नमते घ्यावे लागले. नागोवा येथे मंगळवारी झालेल्या लढतीत बंगळूरच्या संघाने सामना 2-1 फरकाने जिंकला. (Bangalore beat FC Goa in the Development League Football Tournament)

बाणावली येथे झालेल्या आणखी एका सामन्यात भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटास गोल नोंदवत जमशेदपूर एफसीने चेन्नईयीन एफसीला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले.

एफसी गोवाविरुद्ध राहुल राजू याने 87व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. त्यापूर्वी 11व्या मिनिटास बेके ओरम याने त्यांना आघाडी मिळवून दिली होती, नंतर 17व्या मिनिटास ब्रायसन फर्नांडिसच्या गोलमुळे एफसी गोवाने बरोबरी साधली. बंगळूर एफसीचा हा सलग दुसरा विजय ठरला. मागील लढतीत त्यांनी ओरम व राजू यांनी केलेल्या गोलमुळे आरएफ यंग चँप्सला हरविले होते. त्यांचे आता सर्वाधिक सहा गुण झाले आहेत. अगोदरच्या लढतीत चेन्नईयीन एफसीला हरविलेल्या एफसी गोवाचे पराभवामुळे तीन गुण कायम राहिले.

बदली खेळाडूचा महत्त्वपूर्ण गोल

बदली खेळाडू लालरुआतमाविया याने 90+5व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे जमशेदपूरने चेन्नईयीन एफसीला विजयापासून दूर ठेवले. त्यापूर्वी 45व्या मिनिटास सोरोखैबाम मैतेई याने केलेल्या गोलमुळे जमशेदपूरने आघाडी घेतली होती. जोसेफ लालव्हेनहिमा याने 51व्या मिनिटास चेन्नईयीनची पिछाडी कमी केली. 88व्या मिनिटास सुहेल पाशा याने पेनल्टी फटका अचूक मारत चेन्नईयीनला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती. प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर आता जमशेदपूरचे चार गुण झाले असून चेन्नईयीनने एका गुणासह खाते उघडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT