BANDODKAR T20 LEAGUE Dainik Gomantak
क्रीडा

Bandodkar T20 League 2022: 'गोवा पोलिस'ला नमवत 'डिचोली'ने पटकावला 'बांदोडकर करंडक'

अंतिम लढतीत गोवा पोलिसांवर 6 विकेटने मात

दैनिक गोमंतक

पणजी: डिचोली क्रिकेट क्लबने अंतिम लढतीत गोवा पोलिस संघावर 6 विकेटने विजय नोंदवून बांदोडकर करंडक बाद फेरी टी-20 क्रिकेट स्पर्धा जिंकली. पणजी जिमखान्याच्या या स्पर्धेतील अंतिम सामना गुरुवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

(Bandodkar Karandak T20 Cricket Tournament was won by Dicholi Cricket Club)

डिचोली क्लबने नाणेफेक जिंकून गोवा पोलिसांना प्रथम फलंदाजीस पाचारण केले. स्वप्नील मळीक याच्या अर्धशतकानंतरही गोवा पोलिसांना 119 धावाच करता आल्या. नंतर डिचोली क्लबने 12.3 षटकांतच 4 बाद 120 धावा करून सामना आणि करंडक आरामात जिंकला.

बक्षीस वितरण सोहळ्यास भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या क्रांती राव, नातू गिरिराज वेंगुर्लेकर, पणजी जिमखान्याचे अध्यक्ष मनोज काकुले, खजिनदार सुरेश कारापूरकर, सदस्य प्रशांत काकोडे व गिरीश पारेख, डिचोली क्रिकेट क्लबचे अध्यक्ष राजेश पाटणेकर यांची उपस्थिती होती.

विजेत्या डिचोली क्रिकेट क्लबला 50,000 रुपये व करंडक, उपविेजेत्या गोवा पोलिस संघाला 25,000 व करंडक देण्यात आला. वैयक्तिक विजेत्यांना प्रत्येकी 5000 रुपये बक्षीस देण्यात आले. गोविंद घाडी (उत्कृष्ट फलंदाज, गोवा पोलिस), सहदेव कांदोळकर (उत्कृष्ट गोलंदाज, गोवा पोलिस), विनेश सतरकर (सामन्याचा मानकरी, डिचोली क्लब), अब्दुल सलाम (स्पर्धेचा मानकरी, डिचोली क्लब) हे वैयक्तिक बक्षिसाचे मानकरी ठरले.

संक्षिप्त धावफलक

गोवा पोलिस: 19.3 षटकांत सर्वबाद 119 (स्वप्नील मळीक 61, अशोक राठोड नाबाद 13, चंद्रकांत घाडी 12, विनेश सतरकर 3-13, तुषार सावंत 3-26, शेरबहादूर यादव 2-17, बादल सिंग 2-29) पराभूत वि. डिचोली क्रिकेट क्लब : 12.3 षटकांत 4 बाद 120 (सनी काणेकर 27, तेक बहादूर 25, रॉबिन डिसोझा नाबाद 29, अब्दुल सलाम नाबाद 14, अविनाश गावस 2-26, अमीर कडेकर 1-24, सहदेव कांदोळकर 1-3).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT