Bandara and Vandersay collision while trying to save a boundary off Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: बाऊंड्री आडवण्याच्या नादात श्रीलंकन खेळाडूंची जोरदार धडक, विराटही आला टेंशनमध्ये; Video

विराट कोहलीने मारलेला चेंडू आडवण्याच्या नादात श्रीलंकन खेळाडूंची जोरदार धडक झालेली.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी पार पडला. तिरुअनंतपुरम ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 317 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेचे दोन खेळाडू एकमेकांना आदळल्याने थोडे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

झाले असे की भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहली फलंदाजी करत असताना त्याने सामन्याच्या 43 व्या षटकातील एका चेंडूवर पुल शॉट खेळला. त्यावर चेंडू डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या दिशेने गेला.

त्यावेळी चेंडू सीमापार करण्यापासून वाचवण्यासाठी आलेले श्रीलंकेचे क्षेत्ररक्षक अशेन बांडरा आणि जेफ्री वांडरसे एकमेकांवर जोरात आदळले. त्यामुळे दोन्ही खेळाडू जखमीही झाले.

ते एकमेकांवर आदळल्यानंतर लगेचच श्रीलंकेचा मेडिकल स्टाफ मैदानावर आला होता. त्यांना भारताच्या मेडिकल टीममधील सदस्यांनाही मदत केली. दरम्यान, या धडकेनंतर वांडरसे त्याच्या पायावर उभा राहू शकत होता, पण बांडाराला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

त्यावेळी वांडरसेने गोलंदाजी करताना 7 षटकात 59 धावा दिल्या होत्या. पण त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्याजागेवर फलंदाजीसाठी कनकशन सबस्टिट्यूट म्हणून दुनिथ वेलालागे उतरला होता.

(Bandara and Vandersay had a collision while trying to save a boundary off Virat Kohli.)

विराटने केली विचारपूस?

या घटनेमुळे विराट देखील थोडा टेंशनमध्ये आलेला दिसला. तो बांडारा आणि वांडरसे यांच्या धडकेनंतर श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाबरोबर चर्चा करतानाही दिसला. यावेळी तो दोन्ही खेळाडूंची विचारपूस करत असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला.

दरम्यान, विराटने या सामन्यात त्याने 46 वे वनडे शतक पूर्ण केले. त्याने 110 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 166 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त शुभमन गिलने देखील 116 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 390 धावा केल्या.

मात्र, नंतर श्रीलंकेला 22 षटकात सर्वबाद 73 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना भारताने 317 धावांनी जिंकला. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT