Mushfiqur Rahim  Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs IRE: मुशफिकुर रहीमने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

BAN vs IRE: बांगलादेशचा वरिष्ठ कसोटीपटू मुशफिकुर रहीमने आयर्लंडविरुद्ध कसोटी शतक झळकावून इतिहास रचला आहे.

Manish Jadhav

BAN vs IRE: बांगलादेशचा वरिष्ठ कसोटीपटू मुशफिकुर रहीमने आयर्लंडविरुद्ध कसोटी शतक झळकावून इतिहास रचला आहे.

ढाका येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 135 चेंडूत शतक पूर्ण केले आणि 126 धावा करुन तो बाद झाला. या शतकासह, तो आयर्लंडविरुद्ध पदार्पणातच कसोटी शतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.

दरम्यान, मुशफिकुरने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शानदार खेळी खेळताना 1 षटकार आणि 15 चौकार लगावले.

विशेष म्हणजे, मुशफिकुरने 66 धावा केवळ चौकार मारुन केल्या. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 10 वे शतक पूर्ण केले आहे.

कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर मोमिनल हक आहे, ज्याने 11 शतके झळकावली आहेत.

रहमत शाहने 98 धावा केल्या

मुशफिकुर रहीमच्या आधी 2019 मध्ये अफगाणिस्तानच्या रहमत शाहने आयर्लंडविरुद्ध 98 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडच्या जॅक लीचने 92 धावा केल्या होत्या.

मात्र या दोन्ही फलंदाजांना शतक झळकावता आले नाही. दुसरीकडे, रहीमने ही संधी सोडली नाही आणि 126 धावा केल्या. तसेच, तो बांगलादेशकडून (Bangladesh) कसोटी फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करणारे टॉप 5

मुशफिकुर रहीम, सामना-85, धावा-5447

तमीम इक्बाल, सामना, 70, धावा – 5103

शकीब अल हसन, सामना 66, धावा- 4454

मोमिनल हक, सामना, 56, धावा- 3635

हबीबुल बशर, सामना 50, धावा- 3026

सामन्याची स्थिती

वास्तविक, पहिला कसोटी सामना 4 एप्रिलपासून शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Stadium) सुरु झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा संघ 214 धावांवर आटोपला. यानंतर बांगलादेशने 369 धावा करत 155 धावांची आघाडी घेतली, त्यानंतर दुसऱ्या डावात आयर्लंडने 27 धावांवर 4 विकेट गमावल्या. या कसोटीत आयर्लंडला पराभवाचा धोका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT