Quetta Blast Dainik Gomantak
क्रीडा

Quetta Blast: पाकिस्तानमध्ये लाईव्ह सामन्यादरम्यानच स्फोट; आफ्रिदी, बाबरसह क्रिकेटर्सची धावपळ

क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झालमी यांच्यात सामना सुरु असतानाच काही अंतरावर स्फोट झाला होता.

Pranali Kodre

Quetta Blast: पाकिस्तानात रविवारी एका ब्लास्टमुळे खळबळ झाली आहे. रविवारी बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे मोठा बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट बुगटी स्टेडियमपासून काहीच अंतरावर झाला होता. महत्त्वाचे म्हणजे त्याचवेळी क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झालमी यांच्यात सुरू होता.

दरम्यान, या स्फोटोची बातमी कळताच हा सामना काहीकाळासाठी थांबवण्यात आला होता. यासामन्यात पाकिस्तानचे अनेक स्टार क्रिकेटपटू खेळत होते. यात क्वेटा ग्लॅडिएटर्सचा कर्णधार सर्फराज अहमद, शाहिद आफ्रिदी, नसिम शाह, पेशावर झालमीचा कर्णधार बाबर आझम अशा खेळाडूंचा समावेश होता.

रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी माहिती दिली आहे की 'स्पोट झाल्यानंतर लगेचच खबरदारी म्हणून सामना थांबवण्यात आला होता आणि खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये काही काळासाठी घेऊन जाण्यात आले होते. नंतर जेव्हा परिस्थितीत निवळली, तेव्हा सामना पुन्हा सुरू झाला.'

हा सामना पाहाण्यासाठी अनेक प्रेक्षकही मैदानात होते, त्यामुळेही थोडा गोंधळ झाला होता. दरम्यान सामना पुन्हा सुरू झाला. हा सामना क्वेटा ग्लॅडिएटर्सने ३ धावांनी जिंकला.

खरंतर क्वेटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सततच्या दहशतवादी हल्ल्यांच्या धोक्यामुळे कोणत्याही क्रीडा स्पर्धा झाल्या नव्हत्या. त्यामुळे तेथील चाहत्यांनी येथेही सामने खेळवण्याची मागणी केली होती. तसेच क्वेटालाही पाकिस्तान सुपर लीगमधील सामने खेळवण्याची मागणी चाहते करत होते. त्यामुळे क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झालमी यांच्यात रविवारी प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला.

दरम्यान, क्वेटामध्ये झालेल्या बॉब्म स्फोटाची जबाबदारी दहशतवादी संघटना तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने स्विकारली आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, येत्या १३ फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुपर लीग २०२३ हंगामाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १९ मार्चला खेळवण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT