Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: 'भारताविरुद्ध विजयासह सुरुवात करण्यास तयार': Babar Azam

टी-ट्वेन्टी विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये क्रिकेटमधील कट्टर शत्रू मानले जाणारे भारत- पाकिस्तान (India vs Pakistan) आमने सामने येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

टी-ट्वेन्टी विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये क्रिकेटमधील कट्टर शत्रू मानले जाणारे भारत- पाकिस्तान (India vs Pakistan) आमने सामने येणार आहेत. याच पाश्वभूमीवर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) टी -20 विश्वचषकाची तयारी करत आहे. 24 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया (India vs Pakistan) विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. मात्र, पाकिस्तान संघाची शोकांतिका म्हणजे भारताला विश्वचषकात (T20 World Cup 2021) कधीही हरवू शकलेला नाही. अशातच विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, आमच्या संघाला भारताविरुद्धच्या विजयाने सुरुवात करायला आवडेल. भारत आणि पाकिस्तान या दोघांनी प्रत्येकी एकदा स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 2007 पासून टीम इंडिया (Team India) कधीच चॅम्पियन बनू शकलेली नाही. या स्पर्धेतील सामने यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान खेळले जातील. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमचा विश्वास आहे की, 24 ऑक्टोबरला टी -20 विश्वचषक सामन्यात भारताशी सामना होणार तेव्हा प्रतिस्पर्धी संघावर आमचा अधिक दबाव असेल. रमीज राजाला भेटल्यानंतर बाबर म्हणाला, 'मला वाटते भारतीय संघ विश्वचषक सामन्यात आमच्यापेक्षा जास्त दबावाखाली असेल. भारताला पराभूत करुन आम्ही आमची मोहीम सुरु करु इच्छितो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दुबईत होणाऱ्या टी -20 विश्वचषकाच्या गट टप्प्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकतील. वर्ल्ड कप 2019 नंतर दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. यापूर्वी भारताने पाकिस्तानचा सहज पराभव केला. बाबर आझम म्हणाला की, यूएईमध्ये खेळणे आमच्यासाठी घरी खेळण्यासारखे असेल. तो पुढे म्हणाला, 'हे आमच्या घरच्या मैदानासारखे आहे, जेव्हा आम्ही यूएईच्या मैदानावर खेळतो, तेव्हा आम्हाला फायदा होतो आणि त्यासोबत आमचे 100 टक्के देणे आवडते.'

यूएईमध्ये होणारी ही स्पर्धा टी -20 विश्वचषकाचा 7 वा हंगाम असेल. ही स्पर्धा 2016 नंतर खेळली जात आहे. वेस्ट इंडिज संघ स्पर्धेचा गतविजेता राहिला असून त्याने दोन वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडनेही प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे. परंतु यावेळी सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार विराट कोहलीवर असेल. त्याच्या नेतृत्वाखाली एकदाही भारताला आयसीसी ट्रॉफी मिळवता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत टी -20 वर्ल्डकपचे जेतेपद पटकावू शकलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT