Babar Azam Family
Babar Azam Family Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam ने अवॉर्डमध्येही केला रेकॉर्ड, क्रिकेटमधील योगदानासाठी...

Manish Jadhav

Babar Azam: पाकिस्तान क्रिकेटमध्ये बाबर आझम नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा त्याच्या कामगिरीमुळे, कधी त्याच्या कर्णधारपदामुळे, तर कधी संघाच्या चांगल्या किंवा वाईट कामगिरीमुळे. बाबर आझम हा एकमेव असा व्यक्ती आहे, ज्याने पाकिस्तान क्रिकेटवर सर्वकाळ वर्चस्व गाजवले आहे.

तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यावेळी पाकिस्तानी क्रिकेट आणि त्याच्या चाहत्यांसाठी अभिमानाचे कारण आहे.

पाकिस्तान सरकारने देशातील सर्वात मोठा नागरी सन्मान बाबरला प्रदान केला आहे. पाकिस्तानी कर्णधाराला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि क्रिकेटमधील योगदानासाठी 'सितारा-ए-इम्तियाज' पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, 28 वर्षीय बाबर आझमला (Babar Azam) गुरुवारी, 23 मार्च रोजी लाहोरमध्ये आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानच्या तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

यासह हा पुरस्कार मिळवणारा तो पाकिस्तानातील सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे. एवढेच नाही तर हा सन्मान मिळालेल्या शाहिद आफ्रिदी, युनूस खान, मिसबाह-उल-हक यांसारख्या माजी क्रिकेटपटूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

पालकांसह पुरस्कार घेतला

तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम याने हा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आणि तो त्याच्या पालकांना, चाहत्यांना आणि पाकिस्तानच्या जनतेला समर्पित केला. बाबरच्या या विशेष कामगिरीचा एक भाग होण्यासाठी त्याचे आई आणि वडीलही उपस्थित होते.

बाबर आझमचा चांगला काळ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबरसाठी गेली 2-3 वर्षे विलक्षण होती. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने (Pakistan) सलग दोन T20 विश्वचषकांच्या उपांत्य फेरीपर्यंत आणि अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. बाबरला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: ''किनारी भागातील व्यवसायांच्या संरक्षणासाठी...''; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आश्वस्त

Bombay High Court: ''विदेशी नागरिक आपल्या देशात मंत्री कसा होऊ शकतो''; सिक्‍वेरा यांच्याविरोधात मिकी यांची हायकोर्टात याचिका

Chandel Water Treatment Plant: चांदेल जलशुद्धी प्रकल्पामध्ये ‘क्लोरीन’ गळती; अनर्थ टळला

Churchill Alemao: ''माझे मत सेक्‍युलर पार्टीलाच, पण काँग्रेसला...''; आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

Goa Crime News: नागाळीत चोरट्यांचा 'सुळसुळाट', दोनापावलातूनही सोन्याचे दागिने लंपास; पोलिसांच्या दुर्लक्षाचा होतोय आरोप

SCROLL FOR NEXT