Axar Patel  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: अक्षर पटेलने रचला इतिहास, T20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा गोलंदाज!

IND vs AUS 4th T20I Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे खेळला गेला.

Manish Jadhav

IND vs AUS 4th T20I Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 20 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली. फिरकीपटू अक्षर पटेलने भारतीय संघाला हा सामना आणि मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.

अक्षर पटेलने हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला

दरम्यान, डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने चौथ्या T20 सामन्यात 4 षटकात केवळ 16 धावा देत 3 बळी घेतले. या तीन विकेट्ससह अक्षर पटेल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. आता या यादीत फक्त जसप्रीत बुमराह त्याच्या पुढे आहे. अक्षर पटेलने T20I मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर, बुमराहच्या नावावर 16 विकेट आहेत. या यादीत अॅडम झाम्पा 12 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.

सामना जिंकल्यानंतर अक्षरचे मोठे वक्तव्य

सामन्यानंतरच्या मॅच प्रेंझटेशनमध्ये अक्षर म्हणाला की, ''पहिल्याच सामन्यापासून मी चांगली गोलंदाजी करत आहे. अशा परिस्थितीत एक-दोन षटकांत खूप धावा झाल्या तर मी ताण घेत नाही. मी फक्त गोलंदाजी कशी करायची याचा विचार करतो. या सामन्यात मी मानसिकदृष्ट्या खंबीर राहिलो आणि स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत राहिलो.''

दुसरीकडे, या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 175 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताकडून जयस्वालने 37 धावांची खेळी केली, तर ऋतुराज गायकवाडने 32 धावा केल्या. यानंतर रिंकूने 29 चेंडूत 46 धावांची तर जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावांची खेळी केली. दरम्यान, 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाची सुरुवात ट्रॅव्हिस हेड आणि जोश फिलिप यांनी केली, या दोघांनी मिळून पहिल्या 3 षटकात 40 धावा जोडल्या. पण ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकांत 7 विकेट गमावून 154 धावांपर्यंतच मजल मारता आली. अक्षरशिवाय दीपक चहरने 2 तर रवी बिश्नोई आणि आवेश खानने प्रत्येकी 1 बळी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT