Team India X/BCCI
क्रीडा

SA vs IND: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात 'या' गोलंदाजाची एन्ट्री! पराभवानंतर BCCI आक्रमक

Avesh Khan: बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी मोहम्मद शमीच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd Test at Cape Town:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला तिसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डावाने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनला होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज आवेश खानची भारतीय संघात निवड केली आहे. त्याला मोहम्मद शमीचा बदली खेळाडू म्हणून संघात संधी देण्यात आली आहे.

शमी दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येऊ शकलेला नाही. तो पहिल्या सामन्यातही भारतीय संघाचा भाग नव्हता.

मात्र, आता पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर बीसीसीआयने आक्रमक पावले उचलत आवेश खानला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनला झालेल्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि 32 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्या सामन्यात भारतीय संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांना खेळवले होते. याशिवाय मुकेश कुमारचाही पर्याय भारतीय संघाकडे आहे.

आता आवेश खानलाही संघात स्थान दिल्याने दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सहापैकी कोणच्या वेगवान गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान खेळवला जाणार आहे.

  • दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT