Women T20 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

Women T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा 'षटकार'

दक्षिण आफ्रिकेवर १९ धावांनी मात

Akshay Nirmale

Women T20 World Cup Finale : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी दक्षिण आफ्रिका संघावर १९ धावांनी मात करत विजेतेपदावर मोहर उमटवली. या विजेतेपदामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाने आता एकूण सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे.

ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 साली टी-20 विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे.

ऑस्ट्रेलियाचे १५७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरवात चांगली झाली होती. सलामीची फलंदाज लॉरा हिने ४८ चेंडुत ६१ धावांची खेळी केली. तिने ५ चौकारांसह ३ षटकार ठोकले. पण तिला इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही.

क्लोई टायरन हिने २५ धावा करत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका निष्प्रभ ठरली. दक्षिण आफ्रिकेला निर्धारित २० षटकात ६ आऊट १३७ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या शुट, गार्डनर, ब्राऊन, जोनासन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पुर्वी निर्धारीत २० षटकांत ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६ बाद १५६ धावा केल्या. त्यांच्या बेथ मुनी हिने ५३ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. तिच्या खेळीत तिने ९ चौकार आणि १ षटकार मारला. तिला अॅशलीग गार्डनर हिच्या २९ धावांचीही साथ मिळाली.

याशिवाय सलामीला आलेल्या अॅलिसा हिली हीने १८ धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शबनिम इस्माईल आणि मेरीझेन काप यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर क्लोई टायरन आणि मलाबा हीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचला होता. दक्षिण आफ्रिकेचा पुरूष संघ देखील यापुर्वी कधीच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकलेला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा ऐतिहासिक सामना होता.

विशेष म्हणजे हा सामना घरच्या चाहत्यांसमोर घरच्या मैदानात खेळण्याची संधी दक्षिण अफ्रिकेच्या महिला संघाला मिळाली होती. पण त्यांचे स्वप्न भंगले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT