PAK vs AUS cricket New, Babar Azam takes superb catch News, Babar Azam News  Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs AUS: बाबर आझमने घेतलेला कॅच तुम्ही पाहिलात का ?

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियन (Australia) क्रिकेट संघ 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या (Pakistan) ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत. याच भागात लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर दोन्ही देशांमधील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिले दोन कसोटी सामने अनिर्णित राहिल्यानंतर हा शेवटचा सामना निर्णायक ठरला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. (Australian cricket team on a historic tour of Pakistan after 24 years)

या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने () वर्चस्व गाजवले आहे. बाबर यावेळी फलंदाजीमुळे नव्हे तर फील्डिंगमुळे चर्चेत आला आहे. साजिद खानच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाने अप्रतिम कॅच घेतला तर बाबरने त्या कॅचसाठी डायव्हिंग केले. या शानदार कॅचमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाचे शतक फक्त नऊ धावांनी हुकले. बाबर आझमच्या शानदार कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकुळ घालत आहे आणि त्याला नेटीजन्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (PAK vs AUS cricket New)

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी केल्या 232/5 धावा

लाहोर कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 5 बाद 232 धावा केल्या आहेत. अॅलेक्स कॅरी 8 आणि कॅमेरॉन ग्रीन 20 धावा करून खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि शाहीन आफ्रिदीने डावाच्या तिसऱ्या षटकात दोन बळी घेत ऑस्ट्रेलियासमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. त्या ओव्हरमध्ये त्याने प्रथम डेव्हिड वॉर्नरला (David Warner) एलबीडब्ल्यू आऊट केले.

त्यानंतर दोन चेंडूंनंतर मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) विकेट कीपर मोहम्मद रिझवानकडे कॅच आऊट झाला. यानंतर उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी करत संघाची धुरा सांभाळली आहे. उस्मान ख्वाजाने 91 आणि स्टीव्ह स्मिथने 59 धावा त्या डावामध्ये केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले.

कराची कसोटीत अप्रतिम कामगिरी

कराचीत झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या डावात बाबर आझमने 196 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे पाकिस्तान संघ सामना ड्रॉ ठेवण्यात यशस्वी ठरला होता. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात पाकिस्तान संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम युनूस खानच्या नावावर होता, ज्याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद 171 धावांची खेळी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT