Australia Test Team X/CricketAus
क्रीडा

AUS vs PAK, Test: लायनच्या 500 विकेट्स, मार्शची अष्टपैलू कामगिरी! ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Australia vs Pakistan, 1st Test: ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध पर्थ कसोटीत दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी घेतली आहे.

Pranali Kodre

Australia vs Pakistan, 1st Test at Perth, Nathan lyon 500 wickets:

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध पर्थला झालेल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी तब्बल 360 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शने सामनावीराचा पुरस्कार जिंकला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर दुसऱ्या डावात विजयासाठी 450 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव 30.2 षटकात अवघ्या 89 धावांतच आटोपला. पाकिस्तानकडून केवळ सौद शकिल (24), बाबर आझम (14) आणि इमाम-उल-हक (10) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

ऑस्ट्रेलियाकडून या डावात गोलंदाजी करताना मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने 2 विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली.

नॅथन लायनच्या 500 विकेट्स

दरम्यान, दुसऱ्या डावात लायनने 2 विकेट्स घेण्याबरोबरच कसोटी कारकिर्दीत 500 विकेट्सचा टप्पाही पूर्ण केला. त्याच्या आता 501 विकेट्स झाल्या आहेत.

तो 500 विकेट्स घेणारा एकूण आठवाच गोलंदाज ठरला आहे, तर तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉर्न (708 विकेट्स) आणि ग्लेन मॅकग्रा (563 विकेट्स) यांनीच हा टप्पा ओलांडला आहे.

ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 113.2 षटकात सर्वबाद 487 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 164 धावांची खेळी केली, तसेच मिचेल मार्शने 90 धावा केल्या. त्याचबरोबर उस्मान ख्वाजाने 41 आणि ट्रेविस हेडने 40 धावांचे योगदान दिले.

पाकिस्तानकडून गोलंदाजीत पहिल्या डावात अमीर जामलने 6 विकेट्स घेतल्या. तसेच खुर्रम शहजादने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शाहिन शाह आफ्रिदी आणि फहिम अश्रफ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानने पहिल्या डावात 101.5 षटकात सर्वबाद 271 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 216 धावांची आघाडी मिळाली. पाकिस्तानकडून इमाम-उल-हकने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. तसेच अल्दुल्ला शफिकने 42 धावा केल्या, तर कर्णधार शान मसूदने 30 धावा केल्या. अन्य कोणाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना नॅथन लायनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जोश हेजलवूड, मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 63.2 षटकात 5 बाद 233 धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीसह पाकिस्तानसमोर 450 धावांचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली, तर मार्शने नाबाद 63 धावा केल्या. तसेच स्टीव्ह स्मिथने 45 धावा केल्या.

पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना खुर्रम शहजादने 3 विकेट्स घेतल्या. तसेच शाहिन शाह आफ्रिदी आणि अमीक जामलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghan Tension: पाकिस्तानात मोठी चकमक! 4 आत्मघाती हल्लेखोरांसह 25 दहशतवादी ठार, पाक-अफगाण सीमेवर पुन्हा तणाव; स्फोटकांचा साठा जप्त

Two US Navy Aircraft Crash: 30 मिनिटांत 2 अपघात! दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट क्रॅश; 5 नौदल अधिकारी जखमी VIDEO

Prithvi Shaw Double Century: 34 चौकार, 5 षटकार... पुन्हा एकदा 'शॉ' टाईम! पृथ्वीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा वर्षाव, 140 चेंडूत झळकावलं द्विशतक

Shashi Tharoor: आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

SCROLL FOR NEXT