क्रीडा

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी ; पहिल्या T20 सामन्यात चार गडी राखून विजय

तीन T20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी

गोमन्तक डिजिटल टीम

भारत ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus T20) यांच्यात होत असलेल्या तीन T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर मात केली आहे. चार गडी आणि चार चेंडू राखून ऑस्ट्रेलिया विजयी झाले आहे. भारतीय संघाने दिलेले 208 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाने 19.2 षटकात पूर्ण केले. मॅथ्यु वेडने नाबाद 45 धावा करत ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला. (Australia won first T20 by four wickets)

भारतीय संघाने प्रथम फंलदाजी करत 208 धावा उभारल्या. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी सुरूवातीच्या पडझडीनंतर तिसऱ्या विकेटसाठी 31 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. केएल राहुलने 55 धावा केल्या, तर सूर्यकुमारने 25 चेंडूत 46 धावा केल्या. हार्दिक पंड्याच्या झंझावाती अर्धशतकामुळे भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 208 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने भारताचे 209 धावांचे आव्हान 19.2 षटकातच पार करत तीन T20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने आक्रमक 61 धावा केल्या. मॅथ्यू वेडने डाव सावरत 21 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने 3 तर उमेश यादवने 2 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

SCROLL FOR NEXT