भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) 2021 चा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकू शकला नाही. सुपर-12 मध्ये भारताला पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडकडून (New Zealand) पराभवाचा सामना करावा लगल्याने टीम इंडियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग बंद झाला होता. यासह भारताचे दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले. टीम इंडियाने 2007 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. पण एक असाही भारतीय आहे, ज्याने 2021 चा T20 विश्वचषक जिंकला आहे. तो ऑस्ट्रेलियन संघात (Australian team) असताना त्याला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळाला आहे. श्रीधरन श्रीराम (Sreedharan Shriram) असे या भारतीयाचे नाव आहे. तो ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. त्याने अॅरॉन फिंचच्या संघासह टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठे विजेतेपदही मिळवले.
श्रीधरन श्रीराम हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियन संघासोबत आहेत. ते 2015 मध्ये फिरकी गोलंदाजी सहाय्यक म्हणून संघात सामील झाले. यानंतर त्यांच्या कामाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि बोर्डावर खूप प्रभाव पडला. यामुळे ते सहाय्यक प्रशिक्षक झाले. टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही एक भाग बनले. श्रीराम भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्यांनी 81 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील श्रीराम यांचे आकडे आश्चर्यकारक असले तरी, येथे त्यांनी 133 सामन्यात 52.99 च्या सरासरीने 9539 धावा केल्या. यामध्ये 32 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. श्रीराम आयपीएलमधील आरसीबी संघाच्या कोचिंग स्टाफचाही एक भाग आहे. ते येथे फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होते.
T20 विश्वचषक फायनलबद्दल बोलायचे झाले तर, मिचेल मार्शच्या 50 चेंडूत नाबाद 77 धावा आणि डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव करून प्रथमच T20 विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाने नाणेफक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. न्यूझीलंड संघाने कर्णधार केन विल्यमसनच्या 48 चेंडूत 85 धावांच्या खेळीच्या जोरावर 4 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या. दोन वर्षांपूर्वी 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत दुर्दैवाने इंग्लंडकडून अंतिम फेरीत हरलेल्या न्यूझीलंड संघाला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विल्यमसनची खेळी मार्श आणि वॉर्नरच्या यांच्या धडाकेबाज खेळीमुळे कुठेतरी झाकोळली गेली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.