Virat Kohli
Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: कोण जिंकणार बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, विजेत्याचा अंदाज...

दैनिक गोमन्तक

IND vs AUS, 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची प्रसिद्ध बॉर्डर-गावस्कर मालिका पुढील महिन्यापासून सुरु होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या हायप्रोफाईल कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटी मालिकेपूर्वीच विजेत्याचे भाकीत केले गेले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटी मालिकेत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कोणता संघ जिंकणार याबाबत मोठा अंदाज बांधण्यात आला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत कोणता संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकेल?

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज इयान हिली याने 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा (India) 2-1 असा विजय होण्याची शक्यता वर्तवली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा विजेता ठरवण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया नागपूर, नवी दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे चार कसोटी सामने खेळणार आहेत. जून 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे.

आधीच अंदाजित विजेता

इयान हिली म्हणाला की, 'भारताचा संघ चांगला आहे, पण जोपर्यंत ते अनुचित विकेट (टर्निंग ट्रॅक) बनवत नाहीत तोपर्यंत मला त्यांच्या फिरकीपटूंची भीती वाटत नाही.'

मिचेल स्टार्कच्या पुनरागमनानंतरही मोठा अपडेट आला

मिचेल स्टार्क बोटाला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीपासून ऑस्ट्रेलियन संघात सामील होईल, ज्याचा त्याला डिसेंबर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध MCG येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान त्रास झाला होता. इयान हिली पुढे म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियाला मिचेल स्टार्कची गरज आहे, जेणेकरुन तो पाहुण्या संघासाठी लवकर विकेट मिळवू शकेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT