IND Vs AUS: ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वविक्रम करणारा भारत ठरला पहिला देश

India vs Australia 3rd T20: भारतीय संघाने शानदार कामगिरी करत तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs Australia T20 Series: भारतीय संघाने शानदार कामगिरी करत तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच भारतीय संघाने विश्वविक्रम करत पाकिस्तानी संघाला मागे टाकले.

भारतीय संघाने विश्वविक्रम केला

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाच्या पराभवासह भारतीय संघ एका वर्षात सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा संघ बनला आहे. टीम इंडियाने (Team India) या वर्षातील 21 वा टी-20 सामना जिंकला आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. 2021 मध्ये एका कॅलेंडर वर्षात पाकिस्तानने (Pakistan) 20 T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. भारतापूर्वी, जगातील कोणत्याही संघाने एका कॅलेंडर वर्षात 20 पेक्षा जास्त T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले नाहीत.

Team India
Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला का वगळलं? रोहितने सांगितले कारण

टीम इंडिया शानदार फॉर्ममध्ये आहे

भारतीय संघ सध्या फॉर्ममध्ये आहे. 2022 मध्ये आतापर्यंत टीम इंडियाने 29 पैकी 21 टी-20 सामने जिंकले आहेत. या वर्षी 10 महिनेही पूर्ण झालेले नाहीत. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपला विक्रम आणखी वाढवू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 4 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र त्यानंतर भारतीय संघाने दणदणीत मालिका जिंकली. 2022 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका खेळायची आहे.

Team India
Ind vs Aus 3rd T20: तिसरा टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने जिंकली मालिका

भारताने मालिका जिंकली

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Australia) मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी भारतासाठी तुफन फटकेबजी केली. या दोघांच्या फलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाज टिकू शकले नाहीत. यानंतर हार्दिक पांड्याने डेथ ओव्हर्समध्ये 16 चेंडूत 25 धावांची तुफानी खेळी केली आणि टीम इंडियाने हा सामना 4 विकेटने जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com